शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरदवाडी शाळेत ऑनलाईन बालमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:14 IST

सिन्नर : कोविड प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत, बालमहोत्सवातील मौजमजेपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी त्यांना घरबसल्या बालमहोत्सवाचा ...

सिन्नर : कोविड प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत, बालमहोत्सवातील मौजमजेपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी त्यांना घरबसल्या बालमहोत्सवाचा आनंद देण्याचा प्रयत्न तालुक्यातील सरदवाडी येथील प्राथमिक विद्यामंदिर शाळेने केला आहे. शाळेमध्ये बालकांच्या संपूर्ण विकासासाठी आवश्यक असलेल्या १२ व्यवस्थांचे प्रदर्शन भरविण्यात आले व ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचविण्यात आली. या बालमहोत्सवाचे उद्घाटन शाळेचे अधीक्षक व कार्यकारी मंडळाचे सदस्य राहुल मुळे व मुख्याध्यापिका सुरेखा जेजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. घर, स्वयंपाकघर, बगीचा, कला शाळा, कार्यशाळा, रंगमंच, क्रीडांगण, पोहण्याचा तलाव, प्रदर्शन दालन, विज्ञान प्रयोगशाळा, चित्र पुस्तकालय, प्राणी-पक्षी संग्रहालय, वस्तूसंग्रहालय अशा बारा अवस्थांचे प्रदर्शन भरवून त्याची माहिती विद्यार्थ्यांसह पालकांना देण्यात आली. यावेळी ऑनलाईन पद्धतीने ‘गुगल मिट’च्या माध्यमातून पालक व बालके, प्राथमिक व बालक मंदिरातील शिक्षक उपस्थित होते. शालेय समितीचे अध्यक्ष मंगेश कुलकर्णी यांनी बालमहोत्सवाच्या आयोजनात मोलाचे मार्गदर्शन केले. बालमहोत्सवाच्या यशस्वितेसाठी बालक मंदिर शिक्षिका अनुपमा रसाळ, वंदना साबळे, हंसा कुलकर्णी, शीला डावरे, कलाशिक्षिका प्रीती पवार, सायली मालपाठक, कदम, अंकिता गुजराथी आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.