मालेगाव : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दि़११ आॅगस्ट पासून शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी आॅनलाइन अपॉर्इंटमेंट सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुधाकर मोरे यांनी दिली. नागरिकांना कार्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून परीक्षा द्यावी लागते. या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ११ आॅगस्टपासून शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी आॅनलाइन अपॉर्इंटमेंटची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे इच्छुक उमेदवार शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीकरिता आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडू शकतील. आगाऊ वेळ (आॅनलाइन अपॉर्इंटमेंट) घेतल्यामुळे नागरिकांना कार्यालयात येऊन रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. आॅनलाइन अपॉर्इंटमेंट ६६६.२ं१३ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर घेता येईल.
शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी आॅनलाइन अपॉर्इंटमेंट
By admin | Updated: August 10, 2014 02:02 IST