शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईसाठी मंगळवारपर्यंत ऑनलाईन अर्जाची मूदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास ३० मार्चपर्यंत संदी उपलब्ध करून देण्यात आली ...

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास ३० मार्चपर्यंत संदी उपलब्ध करून देण्यात आली असून आरटीईच्या संकेतस्थळावर शनिवार(दि.२७) सायंकाळपर्यंत सुमारे १२ हजार ४२६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी यापूर्वी २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. ही मूदत वाढवून देण्यात आली असून आता मंगळवार (दि.३०)पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. शहरातील ९१ शाळांसह जिल्ह्यातील ४५० शाळांनी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नोंदणी केलेली असून शहरातील ९१ शाळांमध्ये १ हजार ५४६ तर उर्वरित जिल्ह्यातील ३५९ शाळांमध्ये २९९८ विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत जागा राखीव आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे १२ हजार४२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत तीन शाळांची वाढ झाली असली आहे. मात्र आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांमध्ये तब्बल १ हजार १३ जागांनी घट झाली आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे शक्य नसल्याने राज्य पातळीवर एकाच वेळी सोडत काढली जाणार आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध जागांच्या प्रमाणातच प्रतिक्षा यादीही या सोडतीच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहे.

इन्फो-

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र

आरटीई प्रवेश प्रक्रियेत लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावरील पडताळणी समितीकडे सादर करावे लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.