शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कांदा गडगडला; शेतकºयांमध्ये नैराश्य आवक वाढली : तेराशेपर्यंत भाव खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:11 IST

महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत.

नाशिक : महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वाढलेली आवक हेच कारण भाव गडगडण्यामागे असले तरी, पाच महिन्यांपासून साठवून ठेवलेल्या कांद्याच्या ढासळत चाललेल्या गुणवत्तेचाही त्यावर परिणाम झाला आहे.सध्या प्रतिक्विंटल रुपये १२०० ते १५०० इतक्या खालपर्यंत कांद्याचे भाव आले आहेत. त्यामुळे शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून त्याची साठवणूक व्यापाºयांकडून करून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने परिस्थितीवर शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. कांदा पिकविणाºया राज्यांमध्ये यंदा अतिवृष्टीने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान झाले, परिणामी देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत भाव गडगडल्यामुळे शेतकºयांनी कांदा चाळीतच साठवून ठेवला. शेतकºयांनी त्यावेळी घेतलेला व्यवहारी निर्णय मात्र त्यांचा फायदा करून गेला. जुलै महिन्यात कांद्याची चणचण भासू लागल्यानंतर शेतकºयांनी साठवलेला कांदा बाहेर काढला परिणामी त्याला चांगला भाव मिळाला. कांद्याची प्रमाणात आवक झाल्यामुळे व्यापाºयांनीही त्याला भाव दिला. तथापि, कांद्याचा बाजार तेजीत आला म्हटल्यावर शेतकºयांनी बाजारात धाव घेतली व नेमक्या बाजारातील सूत्र बिघडल्याने कांदा गेल्या आठवड्यापासून जितक्या झपाट्याने वर गेला तितकाच खाली कोसळण्यास सुरुवात झाली. कांद्याच्या तेजीवर सणासुदीचा आनंद द्विगुणीत करण्याच्या तयारीत असलेले शेतकरी नैराश्येत सापडले.ग्राहकांना फायदा नाहीचबाजार समितीत कांदा गडगडून निम्म्यावर आला असला तरी, त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत नाही. आजही कांदा बाजारात ३० ते ३५ रुपये इतका भाव असून, दुसरीकडे कांदा पिकविणाºया शेतकºयाला मात्र या बाजारातील भाववाढीचा काहीच लाभ होत नाही.गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढल्याच्या वृत्तामुळे केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारभाव कमी करण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला व इजिप्तहून काही प्रमाणात कांद्याची आयातही झाली. त्यामुळे भविष्यात कांद्याला भाव मिळणार नाही अशा अनामिक भीतीपोटी जिल्ह्यातील शेतकºयांनी साठवलेला कांदा बाहेर काढला. प्रचंड आवक झाल्यामुळे कांद्याला १२०० ते १७०० इतकाच भाव मिळाला, त्यातही कांद्याचा दर्जा पाहून व्यापाºयांनी भाव ठरविण्यास सुरुवात केली आहे.