शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

देवळा तालुक्यात कांद्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:58 IST

देवळा : तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार शेतातून चोरट्यांनी २० ते २५ क्विंटल कांदा चोरला

देवळा : तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे.निर्यातमूल्य शून्य होताच कांदा भावात वाढ होत असल्याने चोरीने शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे. देवळा तालुक्यातील वरवंडी येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग सुखदेव शिंदे यांचा गावालगत मळा आहे. त्यांनी आपल्या शेतातील रांगडा लाल कांदा काढून शेतात एका ठिकाणी साठवून ठेवला होता. शिंदे बुधवारी बाजार समितीत सदर कांदे विक्रीसाठी घेऊन जाणार होते. आज सकाळी ते आपल्या शेतावर गेले असता त्यांना कांदा चोरट्यांनी भरून नेल्याचे समजताच त्यांनी ही माहिती गावातील पोलीसपाटलांना दिली.आजच्या बाजारभावानुसार शिंदे यांचा सुमारे ५० हजार रुपयांचा कांदा होता. या घटनेमुळे शेतकरीवर्ग भयभीत झाला असून, या घटनेचा पोलिसांनी छडा लावून कांदा चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या कांद्याला बºयापैकी बाजारभाव असल्याने शेतकºयांना दोन पैसे मिळत आहेत, त्यात अशी घटना घडत असेल तर त्यांनी न्याय कोणाकडे मागावा, अशी शेतकºयांची अवस्था झाली आहे.यात्रेनिमित्त उमराणा बाजार समिती बंदउमराणा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्थानिक यात्रेनिमित्त मंगळवार, दि. १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सलग तीन दिवस कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती संचालक मंडळाच्या व कांदा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सभापती राजेंद्र देवरे, सचिव नितीन जाधव यांनी दिली.उमराणा येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. यानिमित्त कांदा मार्केट आठ दिवस बंद राहत होते. मात्र शेतकरी हिताचा निर्णय घेत फक्त तीन दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. तसेच भुसार मार्केटही (मका व इतर) दि. ९ ते १९ फेब्रुवारीदरम्यान बंद ठेवण्यात आले आहे. याची शेतकºयांनी नोंद घ्यावी. केवळ १० ते १२ आणि १६ ते १८ फेब्रुवारी रोजी कांदा मार्केट सुरू राहील व १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती असल्याने त्या दिवशीही मार्केट बंद राहील, अशी माहिती सभापती राजेंद्र देवरे, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, सचिव नितीन जाधव यांनी दिली.