शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

कांदा उत्पादकांना फटका

By admin | Updated: August 8, 2016 23:07 IST

सरदवाडी : चाळीत शिरले पुराचे पाणी

सरदवाडी : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या जोरदार पावसामुळे शिवनदीला महापूर आला होता. पुराचे पाणी शेतांमध्ये साठल्याने कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर सांडव्यावरून मिटरभर उंचीने पूरपाणी वाहत असतानाही पावसाचा जोर कायम राहिल्याने धरण परिसरातील मोठ्या प्रमाणात शेती पुराच्या पाण्यात बुडाल्याचे चित्र होते. संपूर्ण एक दिवस व एक रात्र पूर पाणी शेतांमध्ये साठून होते. येथील अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळी शेतांमध्येच असल्याने साठलेल्या पूर पाण्याचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. धरणापासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मण पांडुरंग लाटे यांची कांदा चाळ आहे. शिवनदीला आलेल्या महापुरामुळे लाटे यांच्या कांदाचाळीत पाणी शिरले होते. चाळीत १७ ट्रॅक्टर कांदे लाटे यांनी साठवून ठेवले होते. २४ तासाहून अधिक काळ मिटरभर उंचीने पाणी चाळीत राहिल्याने लाटे यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सरदवाडी धरण ओव्हर फ्लो झाल्याने स्मशानभूमी परिसर जलमय झाला होता. त्यातच स्मशानभूमीलगतचा पूल पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे.