शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्ती, रुंदीकरणासाठी कांदा उत्पादक संघटनेचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:13 IST

सिन्नर तालुक्यातील उत्तर भागातील नायगाव, जोगलटेंभी, सोनिगरी, ब्राह्मणवाडे, वडझिरे, देशवंडी, जायगाव आदी गावांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सिन्नर कृषी उत्पन्न ...

सिन्नर तालुक्यातील उत्तर भागातील नायगाव, जोगलटेंभी, सोनिगरी, ब्राह्मणवाडे, वडझिरे, देशवंडी, जायगाव आदी गावांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टर व पिकअप या वाहनांमधून घेऊन येत असतांना तसेच या भागातील नागरिकांनाही सिन्नरकडे ये-जा करत असताना सदर खराब रस्त्यामुळे प्रवास करतांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. रस्ता अरुंद असल्याने आणायची रहदारी वाढल्याने मागील काही महिन्यांमध्ये अनेकांना अपघातामुळे नाहक प्राण गमवावे लागले आहे. तर काही लोकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. या रस्त्यावरून सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या गावांच्या नागरिकांची तसेच एकलहरे येथील औष्णिक वीज केंद्रातून राखेची वाहतूक करणाऱ्या काही अवजड वाहनांमुळे तसेच नाशिक जिल्ह्यातील निफाड व नाशिक सहकारी साखर कारखाने बंद असल्याने या भागातील ऊस उत्पादकांचा ऊस नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पोहचण्यासाठी याच रस्त्याचा वापर होत आहे. गेल्या पंचवीस वर्षात एकदाही थेट सिन्नर ते नायगाव १३ किलोमीटरच्या या संपूर्ण रस्त्याचे एकाच वेळेस काम झालेले नाही. शेकडो छोट्या-मोठ्या वाहनांची दिवस-रात्र या रस्त्याने वाहतूक होत असल्याने तसेच माळेगाव एमआयडीसी येथून निफाड, मालेगाव, नांदगाव, लासलगाव, मनमाड आदी ठिकाणच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने व हा रस्ता खूपच अरुंद असल्याने व या रस्त्यावर व साईड पट्ट्यांवरही खड्डे पडलेले आहेत. सदर रस्त्याचे तत्काळ रुंदीकरणाससह दुरुस्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, जायगावचे माजी उपसरपंच कैलास गिते, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल गिते तसेच सुभाष दिघोळे रामराव दिघोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : २१नायगाव१

सिन्नर- नायगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देतांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे. समवेत अतुल गिते सुभाष दिघोळे, कैलास गिते, रामराव दिघोळे आदि.

===Photopath===

210321\21nsk_9_21032021_13.jpg

===Caption===

सिन्नर- नायगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देतांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे. समवेत अतुल गिते सुभाष दिघोळे, कैलास गिते, रामराव दिघोळे आदि.