शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:17 IST

येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून १०० ते ४०० रुपये व सरासरी २५० रु पये प्रतीक्विंटल भाव कांद्याला मिळाला. कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष घालावे

येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून १०० ते ४०० रुपये व सरासरी २५० रु पये प्रतीक्विंटल भाव कांद्याला मिळाला. कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.केंद्र आणि राज्य सरकार पाच राज्यातील निवडणूक प्रचारात व्यस्त असून राम मंदिर, आरक्षण विषयात ईतर पक्ष संघटना सहभागी असल्याने शेतीमाल भावाचा प्रश्न बाजूला पडला असून शेतकर्?यांच्या जीवनामरणाचा प्रश्न सरकारने त्वरित हाती घ्यावा आणि शेतकºयांनी विकलेल्या मालावर त्वरित अनुदान जाहिर करावे व फरकाची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे केली आहे.मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. आलेला पैसा चाळ बांधण्यात खर्च केला. कांदा साठवणूक केली मात्र आठ महिने कांदा साठवून आज मातीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शासनाच्या धोरणामुळे आली असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने आयात-निर्यात धोरणात सुधारणा करून शेतकºयांना योग्य भाव मिळवून द्यावा आणि बाजारात नव्याने येत असलेल्या नविन लाल कांद्यालाही भाव मिळण्यासाठी उपाय योजना करावी. यंदा दुष्काळी परिस्थिती असताना शेतकºयांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन करून, टॅकरने पाणी विकत घेऊन कांदा जगावला. मात्र त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकºयांमधे सरकार विरोधी नाराजीची भावना व्यक्त होत आहे.अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घेऊन कांदा उत्पादक शेतकºयांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने निवेदनात केली आहे.या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, अरूण जाधव, योगेश सोमवंशी, बाळासाहेब गायकवाड, सुभाष सोनवणे, विठ्ठल वाळके, हरिभाऊ पवार, योगेश गायकवाड, संजय पाटील, मधुकर देशमुख, सतिश पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.