दिंडोरी : मराठा क्र ांती मूक मोर्चासाठी जिल्हाभरातून आलेल्या समाजबांधवांसाठी अल्पोपाहार देण्यासाठी अनेकांनी सेवा बजावली. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांनी अल्पोपाहारासाठी खास सोलापूरहून ज्वारी-बाजरीच्या सहा महिने टिकणाऱ्या ज्वारी, बाजरीच्या भाकरी, मिरचीचा ठेचा, कांदा, शेंगदाणा चटणी , मसालेदार पुरीभाजी या अस्सल ग्राम ढंगातील पदार्थांची मेजवानी दिली.अल्पोपाहारास विक्रमी प्रतिसाद लाभला. सकाळपासून ५ लाख लोकांनी लाभ घेतल्याचे सांगण्यात आले. या स्टॉलला खासदार हेमंत गोडसे यांनी भेट दिली़ त्यांनी स्वत: तिथे ३ तास थांबून मराठा बांधवांना अस्सल जेवण वाढून देण्यासाठी स्वयंसेवा केली. यावेळी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.(वार्ताहर)
कांदा, ठेचा, ज्वारी-बाजरीची भाकरी!
By admin | Updated: September 24, 2016 23:31 IST