शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

कांद्याची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त

By admin | Updated: October 10, 2014 23:49 IST

कांद्याची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त

मनमाड : कांद्याच्या बाबतीत आम्ही काहीही निर्णय घेतला नाही, असे म्हणणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच कांद्याची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त केली असल्याची घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे येवला व नांदगाव मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ मनमाड येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुका अध्यक्ष बापूसाहेब कवडे, पंकज भुजबळ, विजयश्री चुंभळे, तुकाराम दिघोळे, मधुकर हिरे, गंगाधर बिडगर, साहेबराव पाटील आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.गावित व पाचपुते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनीच त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या. आमच्याकडे असताना ते भ्रष्टाचारी होते तुमच्याकडे आल्यानंतर संत कसे झाले,असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालकांचे भाषण दूरदर्शनवरून दाखवल्याच्या प्रकाराबद्दल बोलताना ते म्हणाले की हे सरकार मुठभर लोकांच्या हिताची जपणूक करणारे आहे. त्याच दिवशी नागपूर येथे सुरू असलेल्या दीक्षाभूमीवरील कार्यक्रमाचे महत्त्व दूरदर्शनला वाटले नसल्याची टीका त्यांनी केली. सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता़ मनमाड पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता़ (वार्ताहर)