शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:59 IST

जिल्ह्यात कांदा व्यापाºयांवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडींचा शेतकºयांना फटका बसला आहे. या धाडसत्राच्या निषेधार्थ व्यापाºयांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद राहिले. मागील चार ते पाच दिवसांपासून कांद्याचे भाव कमी होत असतानाच गुरुवारच्या धाडसत्रामुळे भावातील घसरण अधिक वेगाने झाली.यामुळे कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे.

नाशिक : जिल्ह्यात कांदा व्यापाºयांवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडींचा शेतकºयांना फटका बसला आहे. या धाडसत्राच्या निषेधार्थ व्यापाºयांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद राहिले. मागील चार ते पाच दिवसांपासून कांद्याचे भाव कमी होत असतानाच गुरुवारच्या धाडसत्रामुळे भावातील घसरण अधिक वेगाने झाली.यामुळे कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. मात्र किरकोळ बाजारात कांदा भावात अद्याप कोणताही फरक पडलेला नाही.वर्षभरापासून गडगडणाºया कांदा दराने अलिकडेच उसळी घेत अल्पावधीत प्रतिक्विंटल अडीच हजारांचा टप्पा गाठला होता . भाव वाढल्याने शेतकºयांनी चाळीत साठविलेला कांदा बाजारात नेण्यास प्राधान्य दिले. शहरी भागात कांदा भावाची ओरड होऊ लागल्याने केंद्र शासनाने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. इजिप्तमधून कांदा आयातीचा निर्णय हा त्याचाच एक भाग. कांदा आयातीची माहिती पसरल्याने बाजार समिती आवारात भाव कमी होतील या धास्तीने शेतकरी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणत आहेत. अचानक आवक वाढल्याने चालू सप्ताहात दर सुमारे ७०० ते ८०० रु पयांनी खाली आले.  एकीकडे ही परिस्थिती असताना गुरुवारी प्राप्तीकर विभागाने जिल्ह्यातील चांदवड, येवला, लासलगाव, सटाणा, पिंंपळगाव बसवंत, उमराणा येथील बड्या कांदा व्यापाºयांकडे धाडी टाकून चौकशी सुरु केली.या धाडसत्रामुळे गुरुवारी सकाळी बाजार समितीमध्ये आलेल्या कांद्याचे लिलाव झाले नाहीत. दुपारनंतर लिलाव सुरु झाले तरी व्यापाºयांनी थेट ५०० रुपये कमी भाव पुकारण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांचा संताप झाला. काही ठिकाणी लिलाव बंद पाडण्यात आले. गुरुवारी लिलाव झाले असले तरी येवला येथील व्यापाºयांनी शुक्रवार व शनिवार लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला लासलगाव येथे तर व्यापाºयांनी बेमुदत बंद पुकारल्याने शेतकºयांना त्याचा मोठा फटका बसला आहे.