शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

कांदा ६ रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:50 IST

लासलगाव : बाजार समितीत सलग कांदा भावात घसरण सुरूच असून, गुरुवारी कमाल भावात दोनशे, तर किमान भावात तीनशे रुपयांची घसरण होत कांदा सहा रुपये किलो दराने विक्री झाला. किमान सहाशे रुपये भाव यावर्षातील सर्वात नीचांकी आहे.

ठळक मुद्देनीचांकी भावलासलगाव बाजार समितीत हंगामातील सर्वात कमी दराची नोंद

लासलगाव : बाजार समितीत सलग कांदा भावात घसरण सुरूच असून, गुरुवारी कमाल भावात दोनशे, तर किमान भावात तीनशे रुपयांची घसरण होत कांदा सहा रुपये किलो दराने विक्री झाला. किमान सहाशे रुपये भाव यावर्षातील सर्वात नीचांकी आहे.गुरुवारी (दि. १) लाल कांद्याची आवक ६०० नग होती. बाजारभाव प्रतिक्विंटल किमान ६०१, कमाल १७०७, तर सरासरी १५०० होते. सोमवारपेक्षा आज येथील कांदा लिलावात कमाल भाव पाचशे, तर सरासरी भावात ३०० रुपये घसरण झाली. सकाळी लाल कांदा आवक ६०० वाहनातून झाली. परंतु बाजारभाव प्रतिक्विंटल किमान ९५० रुपये, कमाल भाव १९०५, तर सरासरी भावाची पातळी १६५० रुपये होती. लासलगाव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात ३०० रुपयांची, तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत १२०० रु पयांची मोठी घसरण होत कांदा दोन हजार रुपयांच्या आत आल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.मागील सप्ताहात ८५,५४४ क्विंटल आवक झाली होती तर किमान भाव १००० तर कमाल भाव ३१५८ व सरासरी भाव २८५३ रुपये होते. कोलंबोवगळता थंडावलेली कांदा निर्यात तसेच लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची राज्यभरातील सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा दुप्पटीने वाढती आवक व गुजरातसह मध्य प्रदेश व इतर राज्यांत झालेली कांदा आवक याचा एकूणच परिणाम महाराष्ट्रातील विशेषत: जिल्ह्यात लासलगावसह विविध बाजारपेठेत वेगाने भावात घसरण होऊन मागील सप्ताहाच्या तुलनेत किमान भावात ६००, किमान ७५२ तर सरासरी भावात ९०० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली. कमी भावामुळे उत्पादन खर्च भरून निघणार नाही, त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. घसरणीचा वेग कायममागील सप्ताहात १७,१६८ क्विंटल कांदा लिलाव झाले. तेव्हा किमान १५००, कमाल ३१५२ तर सरासरी भाव २८५१ रुपये होते. या सप्ताहात सोमवारी लिलावात किमान, कमाल व सरासरी भावात वर्षातील विक्र मी वेगाने घसरण होत १९,१५६ क्विंटल कांदा लिलावात किमान ९००, कमाल भाव २४०० तर सरासरी १९५१ जाहीर झाला. गुजरातबरोबरच मध्य प्रदेशसह इतर राज्यांत नवीन कांदा प्रचंड बाजारपेठेत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील तेजीत असलेल्या कांद्याची मागणी कमी होऊन सोमवारी भावात दररोज घसरण होत आहे.