शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

शंभर वर्षांची साक्षीदार रुंग्टा शाळा टाकणार कात

By admin | Updated: July 14, 2017 01:35 IST

नाशिक : रुंग्टा शाळेचे पुनर्निर्माण कामास सुरुवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शंभर वर्षांची परंपरा असणाऱ्या, नाशिकभूषण कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर, प्रख्यात भारतीय क्रि केटपटू बापू नाडकर्णी, थोर शेतकरी नेतृत्व शरद जोशी यांच्यासारख्या दिग्गजांना घडवणाऱ्या रुंग्टा शाळेचे पुनर्निर्माण कामास सुरुवात झाली आहे. जुनी शाळा पाडून त्या जागेवर आधुनिक स्वरूपाची प्रशस्त शाळा बांधण्यात येणार आहे. बुलडोझरच्या सहाय्याने जुने बांधकाम पाडण्यात येत असून, पुनर्निर्माण कामास लवकरच प्रारंभ होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी विद्यार्थी ई-लर्निंग सुविधा असणाऱ्या अत्याधुनिक शाळेत शिक्षणाचे धडे गिरवू शकणार आहेत.काळानुरूप इमारत जीर्ण झाल्यामुळे संस्थेच्या वतीने शतकमहोत्सवी वर्षात त्या जागेवर नवीन इमारत उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नवीन इमारत ही तळमजला आणि त्यावर दोन मजले अशा तीन मजली स्वरूपात राहणार आहे. अत्याधुनिक स्वरूपाचे प्रशस्त असे एकूण ३० वर्ग या शाळेत असतील. लायब्ररी तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळेसह परिपूर्ण इमारत उभारण्यात येणार आहे. त्यात एका सत्रात मुलांचे सर्व वर्ग आणि दुसऱ्या सत्रात मुलींचे सर्व वर्ग अशी त्याची रचना राहणार आहे. सध्या शाळेतील प्रशासकीय इमारत, अर्ध्या शाळेचे भाग पाडण्यास सुरुवात केली असून, तेवढ्या भागास पत्र्यांचे कम्पाउंड करून तो भाग बंदिस्त करण्यात आला आहे. शाळेतील मागील भागातील उर्वरित इमारतीत वर्ग सुरू आहेत. सकाळ सत्रात मुलांचे वर्ग, दुपार सत्रात मुलींचे वर्ग असे नियोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात कोणताही अडथळा येणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. पाडलेल्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित शाळेचे पाडकाम आणि पुनर्निर्माणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.