शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या समस्या सोडविण्यासाठी ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 01:15 IST

देवळा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांच्या वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी मंगळवारी ह्यएक गाव-एक दिवसह्ण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ...

ठळक मुद्देदेवळा तालुक्यात महावितरणचा उपक्रम

देवळा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांच्या वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी मंगळवारी ह्यएक गाव-एक दिवसह्ण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. खुंटेवाडी येथील सभागृहात शेतकरी व नागरिक यांच्याशी संवाद साधत या अभियानाची माहिती देण्यात आली. या अभियानांतर्गत विद्युत जोडणी, विजेचे खांब तसेच तारांच्या अडचणी, रोहित्रातील बिघाड यांबाबत ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. उपकार्यकारी अभियंता राजेश हेगडे यांनी तातडीने निर्णय घेत शेतकरीवर्गाच्या समस्यांचे निराकरण केले. येथील भाऊसाहेब आनंदा पगार, प्रशांत भामरे यांना त्वरित विद्युत जोडणी कोटेशन देण्यात आले. ज्या ठिकाणी तारा, खांब यांबाबत तक्रारी होत्या त्या दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. तसेच विद्युत बिल भरणा करणेसंदर्भात सवलतीचे धोरण विद्युत वितरण कंपनीने स्वीकारले असून त्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक अभियंता आर. पी. महाजन, आर. एस. खाडे, वीज ठेकेदार सतीश बच्छाव, सहाय्यक लेखापाल निशान आहेर, वायरमन नागू भामरे यांनी संयोजन केले. यावेळी उद्धव भामरे, जिभाऊ भामरे, राजाराम सावकार, संजय भामरे व इतर शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच भाऊसाहेब पगार यांनी केले.नवीन कृषीपंप जोडणीबाबत या योजनाअभियानांतर्गत नवीन कृषीपंप जोडणीबाबत या योजना आहेत. पैसे भरून प्रलंबित असलेल्या व ३० मीटर अंतर असलेल्या अर्जदारास एकच महिन्यात अर्जजोडणी तसेच ३० ते २०० मीटर अंतर असल्यास एरियल बेंच केबलद्वारे तीन महिन्यांच्या आत वीजजोडणी आणि २०० ते ६०० मीटर अंतर असल्यास उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी. याशिवाय ६०० मीटर पेक्षा जास्त अंतर असल्यास सौरपंपाद्वारे वीज जोडणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज