शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

एकावेळच्या धूम्रपानाने  १४ मिनिटांनी घटते आयुष्य :  नागेश मदनूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:32 IST

विडी, तंबाखू, सिगारेटसारख्या अमली पदार्थांचे सेवन तरुणाईमध्ये वाढत्या कॅन्सरचे प्रमुख कारण ठरत आहे. एका सिगारेटमध्ये चौदा हजारांहून अधिक विषारी रायायनिक घटक असतात, त्यामुळे एकावेळचे धूम्रपान माणसाचे आयुष्य १४ मिनिटांनी घटण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ज्ञ डॉ. नागेश मदनूरकरांचे यांनी केले आहे.

नाशिक : विडी, तंबाखू, सिगारेटसारख्या अमली पदार्थांचे सेवन तरुणाईमध्ये वाढत्या कॅन्सरचे प्रमुख कारण ठरत आहे. एका सिगारेटमध्ये चौदा हजारांहून अधिक विषारी रायायनिक घटक असतात, त्यामुळे एकावेळचे धूम्रपान माणसाचे आयुष्य १४ मिनिटांनी घटण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ज्ञ डॉ. नागेश मदनूरकरांचे यांनी केले आहे.  गंजमाळ येथील रोटरी क्लबच्या सभागृहात नाशिक रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे शनिवारी (दि.२२) प्रोटेस्ट ग्रंथींच्या कॅन्सरवर व्याख्यान देताना ते बोलत होते. नागेश मदूनरकर म्हणाले, तंबाखू सेवन व धूम्रपान यामुळे देशभरात दरवर्षी एक कोटी नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. आज देशातील सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक तरुणाई या दोन्हींच्या आहारी गेली असून, तरुणाईमधील धूम्रपान खऱ्या अर्थाने चिंतेचा विषय बनला आहे. प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला लक्षात येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यावरच हा आजार लक्षात येत असल्याने चाळिशीनंतर नियमित तपासण्या गरजेच्या असल्याचे डॉ. मदनूरकर यांनी सांगितले. दरम्यान, त्वचादानाविषयी जनजागृती करण्यासाठी चित्रफितही दाखविण्यात आली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. यशवंत पाटील, शर्मिला मेहता, जी. एम. जाधव आदी उपस्थित होते. डॉ. कोठारी यांनी सूत्रसंचालन केले.कॅन्सर कुठेही होऊ शकतोऔद्योगिकीकरण व लोकसंख्या यामुळे मुत्राशय व किडनीच्या कॅन्सरच्या प्रमाणात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनांच्या आहारी गेली असून, तब्बल ७० टक्के तरुणांना तंबाखू व सिगारेटच्या व्यसनात गुरफटल्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवत आहे. देशात एकशे तीस कोटींपैकी ४० ते ४५ कोटी लोकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे देशात तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे डॉ. नागेश मदनूरकर यांनी सांगितले.

टॅग्स :cancerकर्करोगSmokingधूम्रपान