शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकलहऱ्यातील एक संच बंद

By admin | Updated: May 7, 2017 01:32 IST

एकलहरे औष्णिक केंद्रामधील वीजनिर्मिती करणाऱ्या पाचपैकी तीन संचावर आलेल्या या प्रकल्पामध्ये सध्या दोनच संच कार्यान्वित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यभरातून वाढलेल्या विजेच्या मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने भारनियमन सुरू करण्यात आले आहे. यास एकलहरे औष्णिक केंद्रामधील नादुरुस्त व तोकडे संचदेखील कारणीभूत ठरले आहे. वीजनिर्मिती करणाऱ्या पाचपैकी तीन संचावर आलेल्या या प्रकल्पामध्ये सध्या दोनच संच कार्यान्वित असून, दिवसाला ४२० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे.नाशिकमधील एकलहरे येथे असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रावर सुमारे चार वर्षांपूर्वी पाच संचाद्वारे वीजनिर्मितीचे कार्य केले जात होते. यापैकी दोन संच सुमारे तीस वर्षांपेक्षा अधिक जुने झाल्यामुळे ते कालबाह्य ठरविले गेले. त्यानंतर प्रकल्पाची भिस्त तीन संचावर येऊन ठेपली. एकूण ६३० मेगावॉट वीजनिर्मिती या प्रकल्पामधून होत असे; मात्र सातत्याने होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे एक संच या उन्हाळ्यात दोनदा बंद राहिला तर दुरुस्तीसाठी पुन्हा आठवडाभरापासून संच बंद पडलेला आहे. यामुळे सध्या आठवडाभरापासून प्रतिदिनी ४२० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. कोळशाच्या वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे हा प्रकल्प स्थलांतरित करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू होत्या. त्यामुळे दोन संच चार वर्षांपूर्वीच बंद पडूनदेखील नवीन संच मिळू शकलेले नाहीत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी नागपूर येथे या प्रकल्पाला नवीन संच उपलब्ध करून देत पूर्ण क्षमतेने वीजनिर्मितीला चालना दिली जाईल, अशी घोषणा केली होती. यामुळे कर्मचाऱ्यांना-देखील दिलासा मिळाला होता; मात्र अद्याप नवीन संच देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने कोणतीही पावले उचललेली नाही. त्यामुळे तीन संचांवर वीजनिर्मितीचे कार्य सुरू आहे.