शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी १३ जणांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:00 IST

मोकाट श्वानांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शुक्रवारी शहरात १३ जणांना श्वानाने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, मनपाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमालेगाव : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; बंदोबस्त करण्याची मागणी

मालेगाव मध्य : शहरात मोकाट श्वानांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शुक्रवारी शहरात १३ जणांना श्वानाने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, मनपाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.शहरातील कल्लुकुट्टी दरगाह मैदान, कुसुंबारोड, आंबेडकरनगर, पंचशीलनगर, गुलशेरनगर, पवारवाडी, मैला डेपो अशा विविध भागांमध्ये श्वानांच्या झुंडी दिसून येत आहेत. त्यामुळे या भागातून दिवसाही नागरिकांना सावध भूमिका घेत रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. प्रामुख्याने मालधे येथील कचरा डेपो व पवारवाडी परिसरात श्वानांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे म्हाळदे घरकुल योजनेत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना जीव मुठीत घेऊन कचरा डेपोजवळून प्रवास करावा लागत आहे. रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणावर श्वान रस्त्यांमध्येच बसलेले असतात. श्वान वाहनांचा पाठलागही करतात. त्यामुळे दुचाकीधारकांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा किरकोळ स्वरूपाचे अपघातही होतात. मनपाकडून श्वान निर्बीजीकरण करण्यात येत होते; मात्र दोन वर्षांपासून ही मोहीम बंद करण्यात आल्याने शहरात श्वानांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.शोएब अंजूम उस्मान गनी, रा. म्हाळधे घरकुल योजना या अडीच वर्षीय बालकास श्वानाने चावा घेतला, तर शुक्रवारी शहरातील हुमैराबानो, गोकुळ बोराडे, गौतम वाघ, गौरव खैरनार, मंगल जाधव, सुवर्णा राऊत, गिरीश निकम, वैभव देवरे, निंबा कांबळे, रमेश बोराळे, कुणाल पवार, विनय सोनवणे व अर्जुन चित्ते यांना श्वानाने चावा घेतला. जखमींवर सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात येऊन घरी सोडण्यात आले. ३, ७, १४ व २१ दिवसांपूर्वी चावा घेतलेल्या अनुक्रमे ६, १३, ६ व ७ अशा एकूण ४५ जणांवरही उपचार करण्यात आले.

मनपाकडून शहरातील श्वानांचे निर्र्बीजीकरण करण्यासाठी उस्मानाबाद येथील कृष्णा सोसायटी फॉर अ‍ॅनिमल या संस्थेस ९४ लाख ६० हजार रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात संस्थेस कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून, सदर ठेका हा तीन वर्षांचा आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील श्वानांवर निर्बीजीकरणाची मोहीम राबविण्यात येईल.- अनिल पारखेस्वच्छता प्रमुख, मनपा

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारdogकुत्रा