शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

महापालिकेसाठी येणार एक सदस्यीय पद्धत

By admin | Updated: September 23, 2015 00:27 IST

जानेवारी १६ ची यादी ग्राह्य : नवीन मतदार नोंदणीची संधी

नाशिक : सन २०१६-१७ मध्ये होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१६ रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्याच ग्राह्य धरण्यात येणार असून, महापालिका व नगरपालिका निवडणुकीसाठी द्विसदस्यीय पद्धती ऐवजी आता एक सदस्यीय पद्धत लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे येत्या ८ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मतदार पुनरीक्षण मोहिमेच्या निमित्ताने निवडणूक इच्छुकांना चांगलीच संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाने ८ आॅक्टोबर ते १६ जानेवारी २०१६ या काळात मतदार पुनरीक्षण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, २०१६-१७ या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी हीच अद्ययावत मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१६ रोजी ज्या मतदाराचे वय १८ होईल असे नव मतदार मतदार नोंदणी करू शकतील. तत्पूर्वी ८ आॅक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यावर मतदारांकरवी हरकती वा सूचना मागविण्यात येणार आहे, त्यानंतर ११ व १८ आॅक्टोबर रोजी विशेष मतदार मोहीम राबविण्यात येऊन अंतिम मतदार यादी १६ जानेवारी २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नगरपालिका, महापालिकेसाठी बहुुसदस्यीय पद्धतीऐवजी एक सदस्यीय पद्धत म्हणजेच एका वॉर्डातून एक सदस्य अशा पद्धतीने निवडणूक होणार आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून सुरू होणारी मतदार पुनरीक्षण मोहीम निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या पथ्यावर पडणार असून, आपापल्या हक्काची मतदार नोंदणी करून घेण्याची आयतीच संधी प्राप्त झाली आहे. मंगळवारी या संदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विशेष मोहिमेच्या प्रचार व प्रसाराची सूचना केली. (प्रतिनिधी)