शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दहा लाख बोगस रेशन कार्ड गिरीश बापट : पन्नास हजार दुकानांवर बसविले मशीन; चार कोटींचे धान्य गरिबांना वाटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:51 IST

आपण मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सहाही महसुली विभागात जाऊन पुरवठा खात्याच्या सुनावणींचा कार्यक्रम हाती घेतला. जेणेकरून सरकार आपल्या दारी हा हेतू साध्य होईल. या काळात १० ते १२ लाख बोगस रेशन कार्ड उघडकीस आणल्याचा दावा अन्न औषध व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देधान्य गोरगरिबांना वाटप एकूण ६२ सुनावणी घेण्यात आल्यादुकानांना आधार कार्डशी लिंक

नाशिक : आपण मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सहाही महसुली विभागात जाऊन पुरवठा खात्याच्या सुनावणींचा कार्यक्रम हाती घेतला. जेणेकरून सरकार आपल्या दारी हा हेतू साध्य होईल. या काळात १० ते १२ लाख बोगस रेशन कार्ड उघडकीस आणल्याचा दावा अन्न औषध व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत केला.दरम्यान, या बोगस रेशन कार्डवरील बचत झालेले चार ते पाच कोटी रुपयांचे धान्य गोरगरिबांना वाटप करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नाशिक विभागाची पुरवठा विभागाची बैठक घेण्यासाठी ते नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आले होते. नाशिक विभागातील ४९ धान्य वितरणाच्या सुनावणी, चार वैद्यकीय मेडिकल दुकानांच्या सुनावणींसह एकूण ६२ सुनावणी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंतच्या तीन वर्षांच्या काळात रेशनसह अन्य दुकानदारांकडून ६६ लाख १३ हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच अनेक दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. राज्यातील ५२ हजारांपैकी ५० हजार दुकानांवर मशीन बसविण्यात आले असून, लवकरच सर्व दुकानांना आधार कार्डशी लिंक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात बोगस रेशन कार्ड तपासणी मोहिमेत जवळपास १० ते १२ लाख बोगस रेशन कार्ड शोधण्यात आले. त्यातून चार ते पाच कोटी धान्याची बचत झाली असून, हे बचत झालेले धान्य लवकरच गोरगरिबांना वाटप करण्यात येणार आहे. अन्न धान्य घोटाळ्यात नाशिकला इतिहासात पहिल्यांदाच धान्य घोटाळ्यातील आरोपीला मोका लावण्यात आला. राज्यात बहुतांश गुदामांमध्ये व वाहतूक वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, धान्य कोठून उचलले, कुठे चालले, वाहन कुठे थांबले, याची माहिती पुरवठा खात्याला मिळणार आहे. उत्तर प्रदेशात छापा टाकल्यानंतर पेट्रोलपंपावर बिघाड करून पेट्रोलच्या मापात बेकायदेशीर फेरफार करण्यात येत असल्याचे ठाणे येथून उघड झाले आहे. तेव्हापासून पेट्रोल पंपांवर पुरवठा विभागाच्या मदतीने क्लिप बसविण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल कंपन्यांसह पेट्रोलपंपचालक पेट्रोल पंपांवर काहीही फेरफार करू शकत नाही. यावेळी पत्रकार परिषदेत आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, भाजपा प्रदेश प्रवक्ते सुहास फरांदे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदी उपस्थित होते.