शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरी लागल्याचे सांगून एक लाखाची फसवणूक

By admin | Updated: October 20, 2015 22:41 IST

लॉटरी लागल्याचे सांगून एक लाखाची फसवणूक

इगतपुरी : कौन बनेगा करोडपती या कार्यक्र माच्या माध्यमातून तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे खोटे सांगून इगतपुरी शहरातील एका साडी विके्रत्याला एक लाख रु पयांचा गंडा घालण्यात आला असून संबंधित मुंबईच्या पाच इसमांविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात साडी विक्रेत्याने तक्रार दाखल केली आहे.इगतपुरी शहरातील भाजी बाजार मार्गावर दिलीप परदेशी यांचे साडी विक्र ीचे दुकान आहे. ८ आॅक्टोबर रोजी परदेशी यांच्या मोबाइल क्र मांकावर मुंबई येथून ००९२३०२७१४९७१० व ००९२३४०७२३१२५८ या दोन्ही क्रमांकावरून दूरध्वनी आले. या दूरध्वनीद्वारे त्यांना सांगण्यात आले की, आम्ही कौन बनेगा करोडपतीमधून बोलत असून तुमचा सदरचा मोबाइल क्रमांक वोडाफोन कंपनीने दिला आहे. तुमच्या मोबाइलमधील सिमवरील क्रमांक ८९९१० हा असून, कौन बनेगा करोडपतीमार्फत तुम्हाला २५ लाखांची लॉटरी बक्षीस म्हणून लागली आहे.दरम्यान, परदेशी यांनी सिमवरील क्र मांक बघितला असता तो अचूकपणे असल्याने सदर दूरध्वनी करणाऱ्या सुंदरसिंघ आणि सिंघानिया या दोन्ही व्यक्तींवर विश्वास बसला. त्यानुसार इन्कमटॅक्स खर्च १५,१०० रुपये तुम्ही करिश्मा सिंघ यांच्या स्टेट बँक शाखा ०००५६०८ येथील या खाते क्रमांकावर ३५०७४६२१५६९ जमा करण्यास सांगितले. ९ आॅक्टोबर रोजी परदेशी यांनी ही रक्कम बँकेत भरली. त्यानंतर कमिशन म्हणून २५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले. परदेशी यांनी पुन्हा स्टेट बँकेच्या रॉबिनकुमार नामक व्यक्तीच्या खात्यावर २५ हजार रुपये जमा केले.दरम्यान, मोठे खाते बनविण्यासाठी पुन्हा ६० हजार रुपये भरण्याचे सांगण्यात आले. परदेशी यांनी उसने ६० हजार रुपये आणून विष्णू प्रसाद पत्रा नामक इसमाच्या स्टेट बँकेच्या या २०२९११७३१३० खाते क्र मांकावर रक्कम जमा केली.दरम्यान, परदेशी यांनी बक्षीसाच्या रकमेसाठी संबंधित व्यक्तींना दूरध्वनी केले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली व अजून एक लाख वीस हजार जमा करा असे सांगण्यात आले. या सर्व प्रकरणात फसवणूक झाल्याचे परदेशी यांच्या लक्षात आले. त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सुंदर सिंघ, सिंघानिया, करिना सिंघ, रॉबिन कुमार व विष्णू प्रसाद पत्रा या पाच जणांविरोधात फसवणूक झाल्याची तक्र ार दाखल केली आहे. (वार्ताहर)