शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा मुलांसाठी एक किलो खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:52 IST

पिंपळगाव बसवंत :- मुलांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी पोटभर पोषण आहार मिळावा म्हणून शासनाकडून अंगणवाडी व शालेय पोषण आहार ...

ठळक मुद्दे नागरिकांचा संताप :आहेरगाव च्या अंगणवाडीतीलप्रकार.

पिंपळगाव बसवंत :-मुलांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी पोटभर पोषण आहार मिळावा म्हणून शासनाकडून अंगणवाडी व शालेय पोषण आहार दिला जातो परंतु खाणारे असंख्य पण मूठभर आहार शिजवून अंगणवाडी सेविकाकडून मापात पाप करून मुलांच्या पोटाची खळगी रिकामी ठेवण्याचे काम सुरु आहे .आहेरगाव येथील अंगणवाडी पोषण आहार वितरणावेळी १५मुलांना फक्त एक किलो पोषण आहार शिजवून दिला जात असल्याचे पंचायत समिती सदस्य पंडित आहेर यांनी केलेल्या चौकशीने समोर आले आहे आहे. तपासी अधिकारी स्वप्नाली कागदे यांच्या दुर्लक्षित मुळे हे प्रकार घडत असल्याचीतक्रारकरण्यातआली.आहेरगाव येथील अंगणवाडी सेविकांची महिलांना अरेरावी नेहमी चर्चेचा विषय बनला आहे.येथील महिलांनी नेहमीत पोषण आहार मिळतो की नाही यासंदर्भात पंचायत समिती सदस्य व माजी सभापती पंडित आहेर यांना बोलवून अंगणवाडीची चौकशी केली असता अंगणवाडीत कोणताही पोषण आहार फलक लावलेला नाही, गेल्या तीन चार मिहन्याचे रजिस्टर भरलेले नाही व उपस्थित१५मुलांसाठी केवळ एक किलो पोषण आहार शिजवलेला होता. तसेच रोज दिला जाणारा नाश्ता देखील दिला जात नाही , येथील विभागाचे दप्तर तपास व सुपरवायझर करणाऱ्याचे देखील दुर्लक्ष असल्याचीतक्रारयावेळीकरण्यातआलीआहे. या अंगणवाडीच्या सेविकेची तात्काळ बदली करावी अशी मागणी यावेळी गावकº्यांनी े केली . यावेळी सविता गांगुर्डे ,स्वाती जाधव ,दीपा गिरडकर, पूजा जाधव, विद्या देशमुख ,अश्विनी कडाळे ,भारती जाधव ,स्वाती गवळी ,पूजा पगारे ,शीतल जाधव ,वैशू कोकाटे , शामिनी शेख ,मुस्कान शेख ,पुजा दाते ,प्रमिला बागुल ,वंदना जाधव ,अर्चना जाधव ,स्वाती कापसे ,आशा भोईर ,कविता जाधव आदी महिलांसह सरपंच पोलीस पाटील व ग्रामसेवक उपस्थित होते.पोषण आहार घेण्यासाठी गेल्यावर येथील अंगणवाडी सेविका अरेरावी करत असते महिलांनाच नव्हे तर गावातील सरपंच, पोलिस पाटील व सदस्यांना देखील आरेरावी करते मुलांना देखील पुरेसा पोषण आहार देत नाही त्यामुळे या महिलेची बदली करावी जेणेकरून गावात याप्रकरणी पुन्हा वाद होणार नाही याची बाल विकास अधिकाऱ्यांनीदखल घ्यावी.-सविता गांगुर्डे,महिला मंडळ अध्यक्ष,आहेरगाव