याप्रकरणी कुणाल आत्माराम धनगर (२५) रा. देवपूर, जि. धुळे यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हिरो कंपनीची एचएफ डिलक्स दुचाकी (क्रमांक एमएच १८ -एक्यू ४८५५) वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी व त्याचे मामेभाऊ भगवान यशवंत माळी (२८) रा. सारदे, ता. सटाणा हे त्यांच्या दुचाकी (क्रमांक एमएच ४१- पी २१८६) वरून वडनेर-रावळगाव रस्त्याने येत होते. सातमाने चौफुलीजवळ रावळगावकडून येणारी दुचाकी वरील दुचाकीला समोरून धडक दिली. यात फिर्यादीचा मामेभाऊ भगवान माळी यांच्या डोक्यात गंभीर मार लागून ठार झाले तर फिर्यादी कुणाल धनगर जखमी झाले. भगवान माळी यांच्या मरणास, फिर्यादीच्या दुखापतीस आणि दुचाकीचे नुकसानीस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून वडकेर खाकुर्डी पोलिसात हिरो दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:48 IST