चांदवड : येथील मुंबई आग्रा रोडवरील श्री नेमिनाथ जैन कॉलेज समोर शनिवारी रात्री मालट्रक व दुचाकीचा अपघात झाला यात दुचाकीवरील पत्नी ठार झाली तर पती व मुलगा गंभीर जखमी झाले.हसननगर देवळा तालुका पाचोरा जिल्हा नाशिक येथील सुधाकर धोंडू कोळी (५०) हे पत्नी निर्मलाबाई सुधाकर कोळी (४७)व मुलगा संदीप सुधाकर कोळी (२०) यांच्यासह दुचाकीवर क्र मांक एम एच १५ सी एन / ६७०५ मालेगाव बाजूकडून नाशिक येथे जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या मालट्रकने क्र. एच आर ७३ ए २३८८ या मालट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील निर्मलाबाई कोळी यांच्या डोक्यास व हात पायात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर सुधाकर कोळी व संदीप कोळी हे गंभीर जखमी झाले जखमींवर येथील उपजिल्हा रु ग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले याप्रकरणी ट्रक चालक हमिद हुसेन निसार अहमद ४८ रा. बल्लबगड हरियाणा यांच्याविरु द्ध पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत व पोलीस करीत आहेत.
ट्रक दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 18:30 IST
चांदवड : येथील मुंबई आग्रा रोडवरील श्री नेमिनाथ जैन कॉलेज समोर शनिवारी रात्री मालट्रक व दुचाकीचा अपघात झाला यात दुचाकीवरील पत्नी ठार झाली तर पती व मुलगा गंभीर जखमी झाले.
ट्रक दुचाकी अपघातात एक ठार
ठळक मुद्देमालट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.