नाशिक : सीबीएसजवळील हॉटेल सम्राटजवळ झालेल्या दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली़ या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव महेश (शंभूशेठ) गिरीराजप्रसाद अग्रवाल (वय ६२, रा़ घ़नं़१३६२, प्रयाग निवास, हॉटेल सम्राटसमोर) असे आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, मेनरोडवरील मंगेश मिठाईचे संचालक महेश अग्रवाल हे रात्री दहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घराकडे जात होते़ सीबीएसजवळील हॉटेल सम्राटजवळील रस्ता दुभाजकावर त्यांची दुचाकी आदळून अपघात झाला़ यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना एका रिक्षाचालकाने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ़ राहुल पाटील यांनी तपासून मयत घोषित केले़ या अपघाताची सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
दुचाकी अपघातात एक ठार
By admin | Updated: April 4, 2015 00:51 IST