शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एक ठार

By admin | Updated: December 27, 2015 23:17 IST

सहा जखमी : चिखलओहोळ शिवारातील घटना

आझादनगर : मालेगाव येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील चिखलओहोळ शिवारातील एकता हॉटेलसमोर इनोव्हा कार पलटी होवून झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला असून कार चालकासह सहा जण जखमी झाले. जखमींवर मालेगावी खासगी रूग्णालयात उपचार सुरू झालेत. घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याबाबत तालुका पोलिसात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. चमणनगरातील तरुण जुबैर नावाच्या मित्राच्या लग्नास जळगाव जवळील पालधी येथे जाण्यासाठी सकाळी साडेसात वाजता इनोव्हा क्र. एमएच ४१ व्ही ३९७४ निघाले होते. मालेगाव शहरापासून अवघ्या १0 कि.मी.अंतरावर एकता हॉटेल येथे ओव्हरटेक करीत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळून पलटी झाली. झालेल्या अपघातात शेख जुबैर शेख निसार अहमद (१८) रा. चमननगर हा जागीच ठार झाला तर चालक वसीम अहमद सलीम अहमद (२६), अवैशखान शब्बीरखान (२0), मोहंमद अलीम फारूख अहमद (१९), शेख इरफान शेख सलाउद्दीन (१९), शेख सलमान शेख रियाजुद्दीन (२0) व अलीम शेख सर्व रा. चमननगर हे जखमी झाले.अपघाताची माहिती कळताच काँग्रेस गटनेते हाजी शेख खालीद, माजी नगरसेवक शकील अहमद यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी मदत केली. जुबैर अहमद याच्या मृतदेहाचे सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून दुपारी दोन वाजता बडा कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला. त्याच्या पश्‍चात आई व तीन भावंडे असा परिवार आहे. तालुका पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.