देवळा : गुंजाळनगर (ता. देवळा) येथे मराठी शाळेजवळ सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खोल चारीत कंटेनर ( जीजे १२ एटी ५३१०) पडल्याने त्यात चालक जखमी झाला.विंचूर-शहादा-प्रकाशा या राज्यमार्गावर गुंजाळनगर येथे रस्ता ओलांडणे धोकादायक झाल्याने या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बाजूने वळवून रस्त्यावर खोल चारी खोदून काँक्रीटीकरण केले जात आहे. रविवारी रात्री नाशिकहून येणार्या कंटेनरच्या चालकाला अंदाज न आल्याने कंटेनर खोल चारीत पडला. या भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर संबंधित विभागाने याबाबत या रस्त्यावरून वेगाने चालणार्या वाहतुकीचा विचार करून मोठ्या आकाराचे काम सुरू असलेल्या ठिकाणापासून थोडे अलीकडे सूचनाफलक लावण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अपघातामुळे भुयारी मार्गाचे काम थांबले आहे. (वार्ताहर)
कंटेनर चारीत कोसळला एक जण जखमी
By admin | Updated: May 28, 2014 01:00 IST