शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त

By admin | Updated: April 11, 2017 00:14 IST

कमिशनवर नोटा बदल : पाच संशयित ताब्यात

नाशिक : नोटाबंदीच्या घोषणेनंतरही जुन्या चलनातील नोटा कमिशनवर बदलून देण्याचे प्रकार सुरूच आहेत़ मुंबई-आग्रा महामार्गावर चार महिन्यांपूर्वी चलनातील १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्याची घटना ताजी असताना सोमवारी (दि़ १०) मुंबई नाका पोलिसांनी द्वारका परिसरात सापळा रचून पाच संशयितांकडून जुन्या चलनातील एक कोटी रुपयांच्या म्हणजेच पाचशे व एक हजार रूपया असे मूल्य असलेल्या नोटा जप्त केल्या आहेत़ पोलिसांनी पकडलेल्या या पाच संशयितांमध्ये चार सराफी व्यावसायिकांचा समावेश असून, २५ टक्के कमिशनच्या बदल्यात त्यांना नोटा बदलून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते़. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांना द्वारका परिसरात कमिशनवर जुन्या नोटा बदली करून देण्याचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती़ त्यानुसार सकाळी दहा वाजेपासून द्वारका परिसरात साध्या वेशात पोलिसांचा सापळा लावण्यात आला होता़ दुपारी बारा वाजेच्या सुमारास वडाळाकडून एक झायलो कार (एमएच १५, टीएस ९५८६) द्वारका सर्कलकडे येऊन थांबली तर विरुद्ध दिशेने सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकीवरून (एम एच १५, एफ डब्ब्ल्यू - ४७) हा प्रमुख संशयित कृष्णा हनुमंत होळकर (५०, रा. गंगापूरगाव, ता. राहुरी, जि. अहमदनगर) हा कारजवळ येऊन थांबला़. द्वारका सर्कलवर झायलो कारमधील संशयित सागर सुभाष कुलथे (३४, रा. द्वारका, नाशिक), शिवाजी दिगंबर मैंद (४५, रा. संगमनेर, जि. अहमदनगर), योगेश रवींद्र नागरे (३५, रा. द्वारका, नाशिक), मिलिंद नारायण कुलथे (४०, रा. संगमनेर, जि. अहमदनगर) व दुचाकीवरील कृष्णा होळकर यांच्यामध्ये बोलणी सुरू असताना या ठिकाणी साध्या वेशात असलेल्या पोलिसांना संशय आला़ यादरम्यान, एक पोलीस वाहन त्याच्या दिशेने येत असल्याचे पाहून त्यांनी पलायनाचा प्रयत्न केला़ मात्र, चारही बाजूने पोलिसांचा वेढल्याने त्यांना पळून जाणे शक्य झाले नाही व ते पोलिसांच्या तावडीत सापडले़मुंबई नाका पोलिसांनी या पाचही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जुन्या चलनातील ९९ लाख ९५ हजार रुपयांच्या (पाचशे व एक हजार) नोटा, झायलो कार व अ‍ॅक्सेस दुचाकी जप्त केली़ याबरोबरच आयकर विभागासही याबाबत माहिती देण्यात आली असून, त्यांनीही पोलीस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली़ पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे, उपनिरीक्षक महेश हिरे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली़ (प्रतिनिधी) —इन्फो—शहरातील दुसरी मोठी घटनापाचशे व एक हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा छापून कमिशनपोटी बदलून देण्याचा प्रयत्न करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू दगडू नागरेसह अकरा संशयितांना आडगाव पोलिसांनी २२ डिसेंबर २०१६ रोजी मुंबई- आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलजवळ सापळा रचून अटक केली होती़ या संशयितांकडून १ कोटी ३५ लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या़ त्यामध्ये चलनातील खऱ्या नोटा १ लाख ३५ हजार रुपयांच्या नोटा होत्या़ यानंतर मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी (दि़१०) १ कोटी रुपयांच्या जुन्या चलनातील खऱ्या नोटा जप्त केल्या आहेत़ शहरातील नोटा जप्तीची ही दुसरी मोठी घटना आहे़खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार द्वारका परिसरात सापळा लावण्यात आला होता़ त्यानुसार या पाचही संशयितांना पकडण्यात आले व त्यांच्याकडून जुन्या चलनातील रोख रक्कम एक कार व दुचाकी जप्त करण्यात आली आहे़ फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १०२ अन्वये ही रक्कम जप्त करण्यात आली असून, आयकर विभागालाही माहिती देण्यात आली आहे़ त्यानुसार आयकर विभागातील अधिकारी या संशयिताची मालमत्ता, व्यवसाय, भरलेला कर याबाबत तपास करणार आहेत़ सद्यस्थितीत या पाचही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपआयुक्त, नाशिकनोटा बदलीचे रॅकेट?भारतीय नागरिकांना चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०१७ तर अनिवासी भारतीयांसाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली होती़ या नोटा मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, नागपूर या शहरांत आहे़ अनिवासी भारतीयांना रेड चॅनेलमधून जावे लागते़ विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांकडे त्यांना बाद झालेल्या नोटांचे मूल्य किती हे जाहीर करावे लागते व नोटा बदलून घेताना रिझर्व्ह बँकेत सादर करण्यासाठी त्यांच्याकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते़ नोटा बदलीसाठी प्रामुख्याने विदेशातील नातेवाईक वा मित्रांचा वापर केला जातो, त्यामुळे मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी कोणाचे विदेशात कनेक्शन आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत़पोलिसांनी ताब्यात घेतलेला कृष्णा होळकर हा प्रमुख संशयित असून, त्याने संगमनेरमधील सराफी व्यावसायिकास जुन्या चलनातील नोटांच्या बदल्यात २० ते २५ टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखविले होते़ त्यानुसार योगेश नागरे, शिवाजी मैंद, मिलिंद कुलथे या तिघांनी ९९ लाख ९५ हजार रुपये बदलून घेण्यासाठी आणले होते़ संशयित होळकर हा या रकमेच्या बदल्यात ६० ते ७० लाख नवीन चलनातील रुपये देणार होता़ मात्र, या संशयितांकडे नवीन चलनातील रक्कम पोलिसांना आढळून आलेली नाही़