शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळ फाट्यावर एक कोटीचा मद्यसाठा जप्त

By admin | Updated: January 17, 2017 23:14 IST

ट्रकचालकाला अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; महसूल बुडविण्याचा प्रयत्न

मालेगाव : हरियाणा राज्यात उत्पादित झालेले भारतीय बनावटीचे नामांकित कंपनीचे ८६३ खोके मद्य व ट्रक असा एकूण एक कोटी ५६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील मंगरूळ फाटा येथे जप्त केला. महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून नामांकित कंपनीची मद्यविक्री करण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हाणून पाडला आहे. हरियाणा राज्यात उत्पादित झालेले मद्य महसूल व कर बुडवून महाराष्ट्रात विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकातील हवालदार मुंजाब, धनंजय बदरगे, उदय शिंदे, दीपक पाटील यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील मंगरूळ फाटा येथे सापळा रचला होता.  पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ट्रकमध्ये एका बंद असलेल्या वॉटर फिल्टर मशीनमध्ये लपवून आणलेल्या मद्याच्या साठ्याची पथकाने तपासणी केली. या ट्रकमध्ये विविध नामांकित कंपनीचे सुमारे ७० लाख ७१ हजार रुपयांचे मद्य आढळून आले. पथकाने ट्रक क्र. यूपी ८३ एटी ३९६८ सह मद्य असा एकूण एक कोटी ५६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालक धर्मेंद्रसिंग परमानंदसिंग याला अटक केली आहे. आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची माहिती पथकातील दुय्यम निरीक्षक शेवाळे यांनी दिली. (प्रतिनिधी)