शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ संकेतस्थळ हॅकिंग प्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 01:16 IST

आरटीओ अधिकाºयाच्या संकेतस्थळावरील लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून वाहने तपासणीसाठी न आणताच त्यांच्या फिटनेस प्रमाणपत्राची नोंदणी करून शासनाची फसवणूक करणाºया संशयितास सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ दीपक गिरधरलाल पटेल असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्यास न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

नाशिक : आरटीओ अधिकाºयाच्या संकेतस्थळावरील लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून वाहने तपासणीसाठी न आणताच त्यांच्या फिटनेस प्रमाणपत्राची नोंदणी करून शासनाची फसवणूक करणाºया संशयितास सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ दीपक गिरधरलाल पटेल असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्यास न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ प्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रात एमएच १५ इजी ४५२१ व एमएच १५ इजी ४६२१ ही दोन वाहने तपासणीसाठी न आणता त्यांना योग्यता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे व यासाठी आपला लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर केल्याचे व्यवसाय मोटार परिवहन निरीक्षक हेमंत हेमाडे (४९) यांच्या १९ आॅगस्ट रोजी लक्षात आले़ त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद नोंदविली होती़ सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी याबाबत सखोल तपास केल्यानंतर ही दोन्ही वाहने सौम्या अर्थमुव्हर्स या नावाने खरेदी करण्यात आल्याचे समोर आले़ तसेच ही दोन्ही वाहने महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा फायनान्सने जप्त केल्यानंतर संशयित दीपक गिरधरलाल पटेल याने खरेदी केलेली वाहने तपासणीसाठी न आणता त्यांचे फिटनेस प्रमाणपत्र तयार केले़ ही दोन्ही वाहने आंध्र प्रदेशातील कुरणाल येथे असल्याचे समजताच ती जप्त करण्यात येऊन पटेल यास अटक करण्यात आली़ दरम्यान, यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी व काही एजंट यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, कर्मचारी व एजंट यांची अभद्र युती पुन्हा एकदा समोर आली आहे़