नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची फिर्याद म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित कृष्णा देवराम शिरसाठ विरुद्ध (३४ रा. निसर्ग गोविंद सोसा. जेलरोड) पारिजातनगर परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेस संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून हे कृत्य केले. २०११ ते २०१६ पर्यंत शिरसाठ याने पंचवटीतील रासबिहारी लिंकरोडवरील सागर स्पंदन सोसायटी व नाशिकरोड परिसरातील साई स्पंदन लॉजिंगमध्ये घेऊन जाऊन महिलेस धमकावून इच्छेविरुद्ध बलात्कार केल्याचे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षक एस. के. सावळा करीत आहेत. (प्रतिनिधी)
बलात्कार प्रकरणी एकाला अटक
By admin | Updated: July 31, 2016 01:10 IST