शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निकम खून प्रकरणी एकास अटक

By admin | Updated: May 20, 2017 02:11 IST

पंचवटी : माजी नगरसेवक चंद्रकांत निकम यांचा पुतण्या किरण राहुल निकम (२९) याच्या हत्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : पंचवटीतील माजी नगरसेवक चंद्रकांत निकम यांचा पुतण्या किरण राहुल निकम (२९) याच्या हत्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी रात्री उशिरा एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या हत्येप्रकरणी म्हसरूळ येथे राहणारा मयताचा मावसभाऊ नितीन पगारे याने दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात सात ते आठ मारेकऱ्यांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल गुरुवारी (दि. १८) पेठरोडवरील शनिमंदिराच्या पाठीमागील नवनाथनगर येथे भरवस्तीत निकम याच्यावर मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. पगारे याने दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री दहा वाजता पगारे परिसरातून दुचाकीवरून जात असताना नवनाथनगर येथे संशयित आरोपी संतोष उघडे, संतोष पगारे यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या निकम याची दुचाकी अडविली व तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत थांबविले.निकम त्याठिकाणी थांबला असता काही क्षणातच पेठरोड परिसरात राहणारे संशयित आरोपी गणेश उघडे, बंडू मुर्तडक व त्यांचे इतर साथीदार त्याठिकाणी आले व त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून हातातील धारदार शस्त्राने निकम याच्या डोक्यावर, छातीवर, तोंडावर सपासप वार केले. वर्मी घाव बसल्याने निकम हा घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व जागीच मयत झाला. त्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळाहून पलायन केले. मयत निकम ज्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याठिकाणी पोलिसांना एक जिवंत काडतूस मिळाले आहे. निकम याच्या हत्येनंतर नवनाथनगर परिसरात तणावाचे वातावरण असून, परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.