शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोड येथील कपलीकर खूनप्रकरणी एकास अटक

By admin | Updated: August 2, 2016 02:16 IST

जेलरोड येथील कपलीकर खूनप्रकरणी एकास अटक

नाशिकरोड : जेलरोड राजराजेश्वरी चौकाजवळील उमाभक्ती अपार्टमेंटमधील नंदा कपलीकर या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे.राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळील उमाभक्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नंदा अनिल कपलीकर (५०) या महिलेचा तिच्याच फ्लॅटमध्ये गेल्या बुधवारी मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मयत नंदा हीच्या मोबाइलवर येणारे-जाणारे फोन व घरी येणाऱ्यांची माहिती घेत तपास चालविला होता.पोलिसांनी याप्रकरणी जवळपास २५ ते ३० जणांची चौकशी केली होती. मात्र, काहीजण पोलिसांकडे चौकशीला न आल्याने पोलिसांनी संशयावरून त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलविले असता खुनाच्या घटनेनंतर एकजण पळून गेल्याची बाब समोर आली. त्यानुसार पोलिसांनी संशयित अरुण किसन बोरसे (३२) रा. रोकडोबावाडी, देवळालीगाव यास सोमवारी सायंकाळी सातपूर शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले. संशयित अरुण हा रिक्षाचालक व बॅँजो वाजविण्याचा व्यवसाय करतो. तपासामध्ये आढळलेल्या बाबीविषयी पोलीस सूत्रांनी सांगितले की, संशयित अरुण याचे मयत नंदा यांच्या घरी येणे-जाणे होते. त्यांच्यात काही कारणावरून वादही होते. रविवारी सायंकाळी अरुण हा तिच्या घरी गेला असता त्यांच्यात पुन्हा वादविवाद होऊन झटापट झाली. यावेळी नंदा हीने प्रतिकारदेखील केला. मात्र अरुण याने दोरीने तिचा गळा आवळत खाली पाडल्याने ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचे हात बांधून व कापडाने गळा आवळल्याची त्याने कबुली दिली. अरुण याला नंदा ही प्रारंभी बेशुद्ध पडली, असे वाटले होते. ती शुद्धीवर आल्यावर पोलिसांकडे तक्रार करेल, अशी भीती अरुणला होती. मात्र बुधवारी सायंकाळी नंदा ही मयत झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तो मुंबई व इतर ठिकाणी पळून गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी कसोशीने तपास करीत या खुनाचा उलगडा केला. (प्रतिनिधी)