शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकर शेतीचे नुकसान : अभियंत्यांची कानउघडणी

By admin | Updated: July 26, 2016 22:40 IST

दीड एकर शेतीचे नुकसान : अभियंत्यांची कानउघडणी

दीड एकर शेतीचे नुकसान : अभियंत्यांची कानउघडणीनाशिक : साधारणत: वर्षभरापूर्वी झालेले जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या मडकेजाम येथील गावतळे अतिवृष्टीने फुटल्याने सुमारे दीड एकर शेतीचे नुकसान झाल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी प्रकाश वडजे यांच्याकडे केला. त्यानंतर वर्षभरात फुटलेल्या या गावतळ्याच्या कामाची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना दिले.मडकेजाम येथील शेतकरी गणपत वडजे, माधव वडजे, शरद वडजे यांच्या शेतात सन २०१४-१५ या वर्षात उर्वरित वैधानिक विकास महामंडळाच्या निधीतून १५ लाखांचे गावतळे मडकेजाम ग्रामपंचायतीने बांधले. ग्रामपंचायतीने या कामासाठी बोडके नामक ठेकेदाराला हे काम दिले होते. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हे गावतळे फुटून वडजे कुटुंबीयांच्या शेतातील टमाटे व अन्य पिकांचे नुकसान झाले. सुमारे दीड एकरवरील शेतीचे नुकसान झाले. तसेच वडजे कुटुंबीयांच्या घरापर्यंत या फुटलेल्या गावतळ्याचे पाणी पोहोचले. मंगळवारी (दि.२६) यासंदर्भात माधव वडजे यांनी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्याकडे तक्रार केली. प्रकाश वडजे यांनी आपल्या गावात गावतळे फुटल्यानंतरही यंत्रणेने आपल्याला साधी माहिती दिलेली नाही, असे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना बोलावून स्पष्ट केले. त्याचवेळी दिंडोरीचे शाखा अभियंता आर. ए. कोळगे व प्रभारी उपअभियंता व्ही. के. सोनवणे यांना बोलावून कार्यकारी अभियंत्याला फुटलेल्या गावतळ्याची का कल्पना दिली नाही, यावरून त्यांची कानउघडणी केली. तसेच वर्षभरातच गावतळे फुटल्याने ते निकृष्ट असल्याचे स्पष्ट होते. या कामाची चौकशी करून तत्काळ अहवाल आपल्याकडे सादर करावा, असे आदेश दिले. त्यानंतर कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी सोनवणे व कोळगे यांना अहवाल पाठविला नसल्याबाबत कानउघडणी केली. (प्रतिनिधी)