शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्'ात पुन्हा २४ तासांत दीड हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:25 IST

नाशिक : शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. मागील ४८ तासांत ३ हजार १३८ रुग्ण जिल्'ात वाढले, तर शनिवारी (दि.१२) दिवसभरात १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शुक्रवारीदेखील १ हजार ५५१ रुग्ण मिळून आले होते. शनिवारी उपचारार्थ दाखल १५ रुग्ण दगावल्याने आता मृतांचा आकडा १ हजार ५० इतका झाला आहे. तसेच १ हजार ६६ रुग्ण २४ तासांत बरे झाले आहेत.

ठळक मुद्दे१५ बळी : दोन दिवसांत वाढले ३ हजार १३८ कोरोनाग्रस्त

नाशिक : शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. मागील ४८ तासांत ३ हजार १३८ रुग्ण जिल्'ात वाढले, तर शनिवारी (दि.१२) दिवसभरात १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शुक्रवारीदेखील १ हजार ५५१ रुग्ण मिळून आले होते. शनिवारी उपचारार्थ दाखल १५ रुग्ण दगावल्याने आता मृतांचा आकडा १ हजार ५० इतका झाला आहे. तसेच १ हजार ६६ रुग्ण २४ तासांत बरे झाले आहेत.कोरोनाग्रस्तांचा आकडा अधिकच उंचावत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्'ात आतापर्यंत सर्वाधिक २९ रुग्ण उपचारादरम्यान दगावले होते. त्यानंतर सलग दोन दिवसांत ३० रुग्ण मृत्युमुखी पडले. जिल्'ात दररोज दीड हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आता प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. मागील आठवडाभरापासून शहरापाठोपाठ जिल्'ातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शनिवारी नाशिक शहरात एक हजार ५०, ग्रामीणमध्ये ४४६, तर मालेगावात ७२ नवे कोरोनाचे रुग्ण मिळाले. यामुळे आता जिल्'ाचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५३ हजार ३२९ इतका झाला आहे. यामध्ये शहरात ३५ हजार ९७४, ग्रामीणमध्ये १२ हजार ९८०, मालेगावात तीन हजार १२४ आणि जिल्'ाबाहेरील २५१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्'ात आतापर्यंत ४० हजार ८६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १० हजार ४१५ रुग्ण सध्या उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ३३ हजार ८४८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. एकूण १ हजार ९३३ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. शनिवारी शहरात ५, तर ग्रामीणमध्ये ९ रुग्ण आणि जिल्हाबाहेरील १ अशा १५ रुग्णांंचा मृत्यू झाला. दिवसभरात जिल्'ात २ हजार ५८ संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.खबरदारीबाबत उदासीनता नकोनाशिककरांनी कोरोनाला हरविण्यासाठी खबरदारी घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत उदासीनता बाळगणे धोक्याचे ठरू शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना योग्य त्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क अवश्य बांधावा, वेळोवेळी आपले हात निर्जंतुक करावे आणि सामाजिक अंतर टिकवून ठेवावे, या सूचना कटाक्षाने पाळाव्यात, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे म्हणाले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल