शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून दीड हजार क्युसेक पाणी प्रवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

नााशिक : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पाऊस बरसत असल्याने रविवारी सकाळी गंगापूर धरणातून ५५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत ...

नााशिक : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पाऊस बरसत असल्याने रविवारी सकाळी गंगापूर धरणातून ५५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असताना दुपारनंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने हजार क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे सायंकाळी धरणातून १५०० क्युसेक वेगाने पाणी गोदावरीत प्रवाहित झाले. त्यामुळे गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात जवळपास सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणांची पाणीपातळी वाढलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास पाच धरणांमधून सकाळपासून विसर्ग केला जात असून, गंगापूरसह दारणा आणि कडवा येथूून होणारा विसर्ग सायंकाळनंतर आणखी वाढविण्यात आला.

गंगापूर धरणक्षेत्रात पाऊस सुरू झाला असला तरी समूहातील गौतमी, काश्यपी धरणाच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झालेली नसल्याने गंगापूर धरणातून विसर्ग केला जात नव्हता. आता समूहातील धरणांची पातळीदेखील वाढल्याने गंगापूर धरणातून रविवारी सकाळपासूनच विसर्गला सुरुवात करण्यात आली. मागीलवर्षी या महिन्यात गंगापूर धरणातून जवळपास दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली होती. यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत विसर्ग कमी असण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे.

दरम्यान, इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. रविवारी दुपारी १२ वाजल्यापासून दारणासह कडवा, आळंदी, वालदेवी , नांदुरमध्यमेश्वर तसेच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास दारणामधून १००६०, कडवामधून १६९६, आळंदीमधून ३० , वालदेवी धरणातून १८३ , नांदुरमध्यमेश्वर येथून १३,४२७, तर गंगापूर धरणातून ५५३ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर मात्र त्यात वाढ होत गेली. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढत असल्याने दुपारी तीन वाजल्यानंतर दारणा धरणातून होणारा विसर्ग १२ हजार ७८८ क्युसेक इतका करण्यात आला. कडवा धरण क्षेत्रात दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने सांडवा विसर्ग सायंकाळी २२०० क्युकेक इतका करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

धरणांमधून विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्री उशिरापर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याचीदेखील शक्यता आहे. मागीलवर्षी गंगापूर धरणातून जवळपास दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली होती. पावसाचा जोर कायम राहिल्यास यंदा यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत धरणक्षेत्रात जवळपास २० मि.मी. पावसाची नोंद झाली.