शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या बहाण्याने वृद्धांचे दागिने लुटणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:23 IST

बसस्टॅण्ड तसेच रिक्षास्टॅण्डवर बसची वाट पाहणाºया वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन दागिने लुटणारा संशयित योगेश सतीश कदम (२३, रा़दीक्षीरोड, ओझर, ता़निफाड, जि़नाशिक) यास आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़०२) सापळा रचून अटक केली़ कदम याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यापैकी एका गुन्ह्यातील लाख रुपयांची सोन्याची पोत त्याच्याकडून जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त विजयकु मार चव्हाण व आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली़

नाशिक : बसस्टॅण्ड तसेच रिक्षास्टॅण्डवर बसची वाट पाहणाºया वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन दागिने लुटणारा संशयित योगेश सतीश कदम (२३, रा़दीक्षीरोड, ओझर, ता़निफाड, जि़नाशिक) यास आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़०२) सापळा रचून अटक केली़ कदम याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यापैकी एका गुन्ह्यातील लाख रुपयांची सोन्याची पोत त्याच्याकडून जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त विजयकु मार चव्हाण व आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली़दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या सईबाई बोडके (५५) या महिलेसोबत संशयित कदम याने ओळख करून घेत तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून आडगाव शिवारातील म्हसरूळ -आडगाव लिंकरोडवर नेले़ याठिकाणी बोडके यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीच्या चार तोळे वजनाच्या दोन सोनसाखळ्या काढून घेतल्याची घटना मंगळवारी (दि़२९) दुपारी घडली होती़ या घटनेस एक दिवस उलटत नाही तोच पुन्हा बुधवारी (दि़ ३०) पुन्हा पिंपळगाव येथील विठाबाई रघुनाथ मोरे (६६) या वृद्धेस घरी सोडण्याच्या बहाण्याने कदम याने नवव्या मैलावर निर्जनस्थळी नेऊन त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची पोत लुटून नेली होती़ वृद्धांना लुटण्याच्या या दोन घटनांनंतर आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर तसेच ग्रामीण भागातील रिक्षा तसेच बसस्टॉपवर पाळत ठेवली जात होती़ त्यातच गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित कदम यास अटक केली़ त्याच्याकडून विठाबाई मोरे यांची लूट केलेली सोन्याची पाच तोळ्याची पोतही जप्त करण्यात आली आहे़ संशयित कदम याने ओझर तसेच आडगाव पोलीस ठाणे हद्दीत एकूण तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे़ आडगाव गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, पोलीस हवालदार मुनीरोद्दीन काझी, पोलीस नाईक अनिल केदारे, पोलीस शिपाई मनोज खैरे, वैभव खांडेकर, नकुल जाधव यांनी ही कामगिरी केली़