औदाणे : अजमीर सौदाणे येथील जुना वळण बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. येथील ग्रामपंचायतीतफै जुन महिन्यात कºहे रस्त्यावरील कनोरी नाल्यावरील २० ते २५ वर्षापूर्वी बुजल्या गेलेल्या बिट्रीशकालीन जुना वळण बंधा -र्याचा गाळ काढून खोलीकरणाचे काम केले होते. ह्यावर्षी समाधान कारक पाऊसामुळे हा कनोरी बंधारा पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाला असुन ग्रामस्थांकडुन समाधान व्यक्त केले जात आहे. या बधां- यात साठवणुक झालेल्या पाण्यामुळे त्या संपूर्ण शिवारातील शेतकऱ्यांना फायदा होईल असे सरपंच धनंजय पवार यांनी सांगितले. ईतर शिवारांनाही अशी कामे पुढच्या पावसाळ्यापर्यंत करून गावाची भूजल पातळी वाढवण्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे असेही सरपंच पवार यांनी सांगितले.अजमिर सौंदाणे येथील बिटीश कालीन कनोरी बंधारा. (२९ औंदाणे १)