शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

त्या’ वृद्धाची तब्बल १७ तासांनंतर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 23:30 IST

जिल्हा रुग्णालय : शौचकुपात अडकला होता पाय; रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड

 नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर अर्धांगवायूच्या झटक्यामुळे उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाचा पाय शनिवारी (दि़२०) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास शौचकुपात अडकला. अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल १७ तासांनी या रुग्णाचा पाय बाहेर काढण्यात यश आले़ या रुग्णाचे नाव समाधान श्रीपाद वानखेडे (५९, रा़ मलकापूर, जि़ बुलढाणा) असे असून रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचे रुग्णाच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे़ शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास वानखेडे एकटेच शौचासाठी गेले होते़ अर्धांगवायुमुळे शरीरावर नियंत्रण ठेवता येत नसल्याने ते शौचालयात पाय घसरून पडले़ यामध्ये त्यांचा डावा पाय शौचकुपामध्ये सुमारे दीड फूट आतमध्ये अडकून पडला़ त्यांनी आरडाओरड करून मदतीची याचनाही केली; मात्र रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याची माहिती मनोज जैन या सहकारी रुग्णाने दिली़एका परिचारिकेने पहाटे पाच वाजेच्या सुमारास वॉर्डबॉयला सांगून वानखेडे यांचा अडकलेला पाय काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यात त्यांना यश आले नाही. तसेच रुग्णालय प्रशासनास याबाबत माहिती दिली़ प्रशासनाने प्रथम सार्वजनिक बांधकाम विभाग व त्यानंतर महापालिकेला माहिती कळविली़ घटनेनंतर तब्बल सहा तासांनी अर्थात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती रुग्णालयाने अग्निशमन दलास दिली़अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी सव्वाअकरा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या शौचकुपाचे बांधकाम तोडून वानखेडे यांचा अडकलेला पाय सुखरूप बाहेर काढला़ शौचालयात असलेले स्टीलचे शौचकूप व अपुरी प्रकाशयोजना यामुळे जवानांना अडचणी येत होत्या़ अखेर सात तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना यश आले. या वृद्धाची सुटका करण्यामध्ये अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन, राजेंद्र बैरागी, डी. बी. गायकवाड, ए. टी. पाटील, डी. पी. परदेशी, डी. आर. लासुरे, अय्याज शेख, मुश्ताक पाटकर, जयेश संत्रस, जी. आर. पोटिंदे, पी. डी. शिंदे, एम. एस. बोधक यांनी विशेष परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)