शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत जुन्या-नव्यांचा मेळ

By admin | Updated: March 25, 2017 22:16 IST

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली येत्या ३० मार्चला सकाळी ११ वाजता विशेष महासभा होणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली येत्या ३० मार्चला सकाळी ११ वाजता विशेष महासभा होणार आहे. स्थायी समितीवर जाण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या असून, सत्ताधारी भाजपासह विरोधकांकडून स्थायीवर जुन्या-नव्यांचा मेळ साधला जाणार आहे. दरम्यान, तौलनिक संख्याबळ निश्चित करण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेत भाजपा- ६६, शिवसेना- ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३ आणि रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. स्थायी समितीवर १६ सदस्य नियुक्त करायचे आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी प्रत्येकी एक अपक्ष आपल्या सोबत घेत गटनोंदणी केलेली आहे, तर शिवसेनेची रिपाइंसोबत आघाडीची नोंदणी प्रक्रिया विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. त्यावर येत्या सोमवारी (दि. २७) निर्णय होणे अपेक्षित आहे. तौलनिक संख्याबळानुसार सद्यस्थितीत भाजपा- ९, शिवसेना- ४, कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे प्रत्येकी एक याप्रमाणे १६ सदस्य स्थायीवर जाऊ शकतात, परंतु दि. २९ मार्चच्या आत विभागीय आयुक्तांनी सेनेसोबत रिपाइंची आघाडी नोंदणी मान्य केल्यास भाजपाचे संख्याबळ एकने घटू शकते. त्यामुळे समसमान ८-८ संख्याबळ होऊन चुरस निर्माण होईल. विभागीय आयुक्तांनी सेना- रिपाइंची आघाडी मान्य न केल्यास मात्र स्थायी समिती नियुक्ती प्रक्रियेच्या वेळी विरोधकांकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थायी समितीत भाजपासह विरोधकांनी जुन्या-नव्यांचा मेळ घातला जाणार  असून, काही ज्येष्ठांबरोबरच नव्या सदस्यांनाही संधी दिली जाणार असल्याची चर्चा  आहे. (प्रतिनिधी) सभापतिपदासाठी दावेदारीस्थायी समितीवर ८-८ संख्याबळ झाल्यास सभापतिपदासाठी निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी दावेदारांचीही संख्या विरोधकांमधून वाढण्याची शक्यता आहे. भाजपाकडून कॉँग्रेसमधून आलेले उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, मनसेतून आलेले शशिकांत जाधव यांच्या नावाची चर्चा आहे, तर सेनेकडून स्वत: अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे, सत्यभामा गाडेकर यांची नावे पुढे येऊ शकतात.