शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील जुन्या पिढीतील गायक काकासाहेब घारापूरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:55 IST

प्रसिद्ध गुरू आणि विद्वान पं स. भ. देशपांडे यांच्याकडे त्यांचे अभिजात संगीताचे शिक्षण झाले होते. 

नाशिक- येथील  जुन्या पिढीतील गायक, संवादिनी वादक आणि गुरू पं. काकासाहेब घारापूरकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले. अंत्यविधी सायं 6 वा. अमरधाम येथे होणार आहे. 

प्रसिद्ध गुरू आणि विद्वान पं स. भ. देशपांडे यांच्याकडे त्यांचे अभिजात संगीताचे शिक्षण झाले होते. नोकरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर येथे त्याकाळात अनेक मोठ्या कलावंतांचे कार्यक्रम आयोजित केले. शिवाय अनेक नामवंत कलावंतांना संवादिनीची साथसंगत केली. त्यात पं. बसवराज राजगुरू ,पं. वसंतराव देशपांडे , पं. पद्माकर कुलकर्णी , पं. राजा काळे अशा अनेक प्रसिद्ध कलावंतांचा समावेश होता. त्या काळात त्यांनी नाशिक म्युझिक सर्कलची स्थापना केली. जिल्हा सांस्कृतिक संघटनेचे ते महत्वाचे सदस्य होते. या संस्थेतर्फे नाशिकमध्ये दरवर्षी शास्त्रीय संगीताचा मोठा महोत्सव होत असे. त्याचप्रमाणे नाशिक च्या मेन रोड वरील गणपती मंदिरातील शास्त्रीय संगीताची परंपरा त्यांनी अनेकवर्ष चालवली आणि संगीत सेवा केली.

संगीतकार म्हणूनही त्यांनी काम केलेले असून त्यांनी संगीत दिलेली योगगीते प्रसिद्ध आहेत, नाशिकमध्ये पूर्वी कलाअरर्घ्य संस्थेने सादर केलेल्या आणि खूप गाजलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या संगीत संयोजनाची जबाबदारी ही सांभाळली होती. गुरू म्हणूनही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये सुनील देशपांडे, मृदुला देव यांचा समावेश आहे.त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.