शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जुने बसस्थानक की चोरट्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:07 IST

शहरातील जुने मध्यवर्ती बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनला असून, गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मौल्यवान दागिने व पैसे लंपास करण्याच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. विशेष म्हणजे ‘हात’ मारणाºयांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याने घोळका करून वृद्ध, महिलांना घेरून त्यांच्या पिशवीतील चीजवस्तू हातोहात लांबविल्या जात आहेत.

नाशिक : शहरातील जुने मध्यवर्ती बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनला असून, गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मौल्यवान दागिने व पैसे लंपास करण्याच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. विशेष म्हणजे ‘हात’ मारणाºयांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याने घोळका करून वृद्ध, महिलांना घेरून त्यांच्या पिशवीतील चीजवस्तू हातोहात लांबविल्या जात आहेत. जुने मध्यवर्ती बसस्थानकातून कळवण, सटाणा, देवळा, दिंडोरी, वणी, घोटी, इगतपुरी यांसह नंदुरबार व काही लांबपल्ल्याच्या बस सोडल्या जातात. सध्या त्र्यंबक मेळा स्थानकातील काही बसेसही या ठिकाणाहून काही दिवसांपासून सोडल्या जात असल्यामुळे साहजिकच प्रवाशांची या ठिकाणी गर्दी होत आहे. नेमका याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांमध्ये प्रामुख्याने महिलांचा भरणा अधिक आहे. एखाद दुसरा पुरुष त्यांच्यासोबत ठेवला जातो, जेणे करून कुटुंबातील सदस्य असल्याचे भासविले जाते. या महिलांच्या हातातही प्रवासाला जातो तशा पिशव्या सोबत असतात. बसचे आगमन झाल्यास जागा पकडण्यासाठी प्रवाशांची होणारी रेटारेटी त्यांच्या पथ्थ्यावर पडते. सावज हेरून तीन ते चार महिला प्रवाशाला घेरतात व त्याच्या खिशातील अथवा बॅगेतील ऐवज हातोहात लंपास करून या महिला पुन्हा गर्दीतून पसार होतात. हाती घबाड लागल्यावर तत्काळ बसस्थानकातून पोबारा करायचा व तास, दीड तासाने पुन्हा नवीन सावज हेरले जाते. एकट्या जुन्या बसस्थानकात चोरट्यांच्या चार ते पाच टोळ्या आहेत.  दोन दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील एका बसमध्ये शिरण्यासाठी प्रवाशांची लागलेली चढाओढ या चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली व पाच ते सहा प्रवाशांचे भ्रमणध्वनी लांबविले गेले. तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात येऊन बसची झडती घेण्यात आली, परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले. या बसस्थानकाचा वापर करणारे बाहेरगावचे प्रवासी घरी गेल्यावर किंवा बसमध्येच त्यांच्या लक्षात चोरी झाल्याचे लक्षात येत असल्याने पोलिसांत तक्रार करण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे बसस्थानकातील वाढत्या चोºयांबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल होत नाही.