शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अधिकाºयांना डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:33 IST

आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा तेरा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी गुुरुवारी (दि.५) सकाळी वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाºयांना कार्यालयात डांबून कुलूप लावून घेतले तसेच ठिय्या आंदोलन केले.

पंचवटी : आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा तेरा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी गुुरुवारी (दि.५) सकाळी वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाºयांना कार्यालयात डांबून कुलूप लावून घेतले तसेच ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतल्याने आडगावात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, चार दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून सकाळ, सायंकाळ वीजपुरवठा खंडित होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी प्रभागाच्या महिला लोकप्रतिनिधीला घेराव घातला होता तसेच वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाºयांना गावबंदीचा इशाराही दिला होता. तरीही विजेचा लपंडाव सुरूच असल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला. गुरुवारी सकाळीच महिलांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला व त्यानंतर ग्रामस्थ आंदोलनात उतरले. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येत असून, शेतीची कामे खोळंबली जात आहे. वारंवार तक्र ारी करूनही वीज वितरण कंपनी दखल घेत नाही शिवाय आडगाव सोडून अन्य भागांत वीजपुरवठा सुरळीत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले व त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले, तर काहींनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसले. यावेळी तेथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारंबे व सहायक अभियंता मनीष पगार आदी दोघे उपस्थित होेते. त्यांच्याकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने त्यांना तेथेच डांबले. घटनेचे वृत्त कळताच महावितरण कंपनीच्या अधिकाºयांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घेराव घातला व वारंवार वीज पुरवठा खंडित का होतो याची विचारणा करून महावितरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने आडगावात काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते. या आंदोलनात नगरसेवक, शेकडो ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदरचा प्रकार महावितरणाच्या वरिष्ठ कार्यालयास कळाल्यांनतर तेथे अन्य अधिकारी तोडगा काढण्यासाठी पाठविण्यात आले.