शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

सत्ताधिकाऱ्यांकडूनच अंदाजपत्रकाचा पंचनामा

By admin | Updated: July 9, 2014 00:32 IST

सत्ताधिकाऱ्यांकडूनच अंदाजपत्रकाचा पंचनामा

 

नाशिक : महापालिकेत सत्ता आल्यानंतर कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचा दावा करणाऱ्या मनसेच्या मुखंडांना आज त्यांच्याच पक्षाच्या तसेच सत्तेतील भागीदार असलेल्या नगरसेवकांनी अक्षरश: तोंडावर पाडले. गेल्या अडीच वर्षांत पालिकेत कामे झाली नाहीत, अवास्तव फुगवलेल्या अंदाजपत्रकातून काय होणार, असा प्रश्न करताना सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. भाजपाच्या नगरसेवकाने तर अंदाजपत्रक जाळण्याची तयारी केली, तर दुसऱ्या नगरसेवकाने तीव्र शब्दांत निषेध केला.महापालिकेचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नूतन सभापती राहुल ढिकले यांनी महापौरांना सादर केले. मनसेचेच माजी सभापती रमेश धोंगडे यांच्या नेतृत्वाली अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे विरोधकांकडून टीका होत असताना, सत्तारूढ गटाकडूनही त्याची चिरफाड झाली. मनसेच्या यशवंत निकुळे यांनी अंदाजपत्रकात तरतूद करून कोणतीही कामे होत नाहीत. गेल्यावेळी नगरसेवकांना ९० लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता; परंतु ३० लाख रुपयांचीच कामे झाली. अडीच वर्षांत बेंच बसविण्याची कामेदेखील झाली नसल्याचा आक्षेप घेतला. याच पक्षाच्या उषा शेळके यांनी पालिकेत अडीच वर्षांत फाईलींसाठी केवळ फिरावे लागते, कामेच होत नाहीत. संपूर्ण प्रभागात दहा ते वीस कोटी रुपयांची कामे व्हायला पाहिजेत; परंतु एक ते दोन कोटी रुपयांचीही कामे होत नाहीत, अशा शब्दांत टीका केली. त्यांचे सहकारी नगरसेवक सलीम शेख यांनी कामे होत असल्याचे बसल्या जागेवरूनच सांगितले. त्यावर शेळके यांनी असे असते तर मी चारचौघांत कशाला बोलले असते, असा प्रश्न करून महापौरांनाही निरुत्तर केले. भाजपाच्या सीमा हिरे यांनी तर निषेधच केला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून तीच ती कामे अंदाजपत्रकात येतात, शाश्वत उत्पन्न नसताना इतक्या मोठ्या तरतुदी करून काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी केला. मनसेचे अ‍ॅड. अरविंद शेळके यांनी त्यांचे समर्थन केले. निविदा असूनही कामांचा अंदाजपत्रकात उल्लेख नाही, असे त्यांनी सांगितले. प्रा. कुणाल वाघ यांनी तर अंदाजपत्रक जाळण्याची तयारी केली होती; परंतु अंदाजपत्रकात राष्ट्रपुरुषांची छायाचित्र असल्याने ती जाळता येत नसल्याचे सांगितले. इच्छामणी मंदिर रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाचे काम होत नसल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर यांनी अंदाजपत्रकात तरतूद करून ९० लाख रुपयांची कामे होत नाहीत. अनेक कामांच्या फाईली आजही आयुक्तांच्या दालनात पडून आहेत, असे सांगतानाच महापौर, उपमहापौरांना तीन आणि दोन कोटींचा निधी आणि स्थायी समिती सदस्यांना मात्र पाच कोटी रुपयांची तरतूद हा स्थायी समितीने अंदाजपत्रकात केलेला प्रकार म्हणजे महापौर-उपमहापौरांचे अवमूल्यन असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)