शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी जुमानेना, महापौरांचे ऐकेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:58 IST

महत्प्रयासाने मोदी कार्डमुळे महापालिकेत बहुमताने सत्ता संपादन करणाºया भाजपातील अंतर्गत विसंवादाचा परिणाम कामकाजावरही होऊ लागला असून, नाराजीमुळे अधिकारी सत्ताधाºयांना जुमानेसे झाले आहे. त्याचा प्रत्यय खुद्द महापौरांना आला आहे. शहरातील स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाºयांच्या वारंवार बैठका घेऊनही कामकाजात सुधारणा होत नसल्याबद्दल महापौरांनी खंत व्यक्त करत थेट आयुक्तांना पत्र लिहून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नाशिक : महत्प्रयासाने मोदी कार्डमुळे महापालिकेत बहुमताने सत्ता संपादन करणाºया भाजपातील अंतर्गत विसंवादाचा परिणाम कामकाजावरही होऊ लागला असून, नाराजीमुळे अधिकारी सत्ताधाºयांना जुमानेसे झाले आहे. त्याचा प्रत्यय खुद्द महापौरांना आला आहे. शहरातील स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाºयांच्या वारंवार बैठका घेऊनही कामकाजात सुधारणा होत नसल्याबद्दल महापौरांनी खंत व्यक्त करत थेट आयुक्तांना पत्र लिहून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.महापालिकेत भाजपाला सत्ता काबीज करून सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्यापही भाजपाला सूर गवसलेला नाही. सहा महिन्यांत झालेल्या महासभांमध्ये विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे भाजपाची स्थिती दोलायमान झाल्याचेच दिसून आले आहे. प्रामुख्याने, सत्ताधारी पदाधिकाºयांमध्ये असलेला अंतर्गत विसंवाद हा पक्षाला वारंवार अडचणीत आणू पाहत आहे. दरम्यान, सहा महिन्यांच्या कालावधीत पदाधिकाºयांसह सत्ताधारी भाजपातील काही नगरसेवकांकडून अधिकाºयांना लक्ष्य केले जात असल्याने अधिकारीवर्गात प्रचंड नाराजीचा सूर आहे. अधिकारीवर्ग आपल्या कक्षात थांबण्याऐवजी महापौर, सभागृहनेता, गटनेता, स्थायी समिती सभापती यांच्या कक्षातच अधिक काळ दिसून येत असून, कामकाजात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केला जात असल्याच्याही तक्रारी अधिकारीवर्ग खासगीत बोलून दाखवत आहेत. मागील आठवड्यात सभागृहनेत्याने सर्व खातेप्रमुखांना कामकाज कसे करावे, याबाबतची संहिताच पाठविल्याने अधिकारीवर्गात तो संतापाचा आणि मनोरंजनाचाही विषय बनला आहे. बैठका हायजॅक करण्याच्या प्रकारामुळेही अधिकारीवर्ग वैतागला आहे. मागील पंधरवड्यात आरोग्य समितीने बोलाविलेली बैठक महापौरांनी हायजॅक करत आरोग्य सभापतीलाच जाब विचारणे सुरू केले होते. पदाधिकाºयांमध्ये एकमेकांत पायपोस नसताना त्यात अधिकारीवर्ग भरडला जात असल्याची चर्चा आहे. अशा नाराजीच्या परिस्थितीत अधिकारीवर्ग सत्ताधारी पदाधिकाºयांना जुमेनासा झाला आहे. त्याचा फटका महापौरांनाही बसला आहे.