शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिदात्याला वही, पेन करा अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:04 IST

चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत. अशा स्थितीत परिवर्तनाची चळवळ म्हणून नागरिकांनी फुले, पेढे नेण्याऐवजी बुद्धिदात्याला एक वही आणि पेन अर्पण केले, तर गरजवंत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होऊ शकेल! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हे आवाहन केले असून, या नव्या चळवळीचा प्रारंभच नाशकातून करण्यात आला आहे.

नाशिक : चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत. अशा स्थितीत परिवर्तनाची चळवळ म्हणून नागरिकांनी फुले, पेढे नेण्याऐवजी बुद्धिदात्याला एक वही आणि पेन अर्पण केले, तर गरजवंत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होऊ शकेल! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हे आवाहन केले असून, या नव्या चळवळीचा प्रारंभच नाशकातून करण्यात आला आहे. गणराय हा श्रद्धेचा भाग असल्याने त्याला महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कधीही विरोध केला नाही. मात्र तो परिवर्तनवादी व्हावा आणि लोकमान्य टिळकांनी ज्या वैचारिक प्रबोधनासाठी हा उत्सव सुरू केला, त्याचे खºया अर्थाने स्मरण व्हावे, अशी समितीची अपेक्षा आहे. बदलत्या काळात उत्सव बदलले पाहिजेत, या उद्देशाने १९९७ मध्ये चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. त्यानुसार गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी परिसरातील नदीपात्रात जाणारे निर्माल्य बाजूला काढतानाच विसर्जित गणेशमूर्ती दान करण्याची चळवळ सुरू केली. आता ही लोकचळवळ झाली असून, त्यामुळेच आता पुढील टप्पा म्हणून बुद्धिदाता गणरायाला वही आणि पेन अर्पण करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा शाखेचे कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी दिली. गणपतीला अर्पण करण्यासाठी नागरिक हार, फुले आणि पेढे किंवा अन्य नैवेद्य देतात. बºयाचदा खूप हार-फुले आल्याने ते वापरले जात नाहीत तसेच नैवेद्यही पडून राहतो. त्यामुळे हार-फुले किंवा नैवेद्य सर्वांनीच देण्याऐवजी जर भाविकांनी बुद्धिदात्याला वही आणि पेन अर्पण केले, तर ते आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना देता येऊ शकेल. गणराय बुद्धी देवता असल्याने बुद्धिवर्धनासाठी अशा-प्रकारचा उपक्रम आधिक संयुक्तिक ठरेल, असे दातरंगे यांनी सांगितले.उत्सव परिवर्तनशील हवेत आणि ते लोकोपयोगी ठरावेत यासाठी महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पूर्वीपासूनच प्रयत्न केले आहेत. समितीने श्रद्धेला कधीही हात घातला नाही. केवळ अशाप्रकारे कृतिशील उत्सव झाला तर ते पुरोगामित्वाच्या दिशेने एक पाऊल ठरेल, तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना ही श्रद्धांजली ठरेल.- महेंद्र दातरंगे, जिल्हा कार्यवाह,महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती