शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:49 IST

प्रसाद योजनेच्या कामांची पाहणी पुरातत्त्व विभागाच्या विभागीय संचालक मालिनी भट्टाचार्य यांनी केली. सुमारे २५ कोटींची कामे सुरू असून, ही सर्व कामे नगर परिषदेशी संबंधित असल्याने त्यावर पालिकेचे नियंत्रण असावे, अशी मागणी शिष्टमंडळाने भट्टाचार्य यांच्याकडे केली.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर येथील प्रसाद कामांचा आढावा

त्र्यंबकेश्वर : येथे सुरू असलेल्या प्रसाद योजनेच्या कामांची पाहणी पुरातत्त्व विभागाच्या विभागीय संचालक मालिनी भट्टाचार्य यांनी केली. सुमारे २५ कोटींची कामे सुरू असून, ही सर्व कामे नगर परिषदेशी संबंधित असल्याने त्यावर पालिकेचे नियंत्रण असावे, अशी मागणी शिष्टमंडळाने भट्टाचार्य यांच्याकडे केली.भट्टाचार्य यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात होणारी कामे तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश संबंधिताना दिले. तसेच मंदिराचे सौंदर्य कसे वाढेल, शहराच्या सौंदर्याला या नवीन कामाने लोक आकर्षित क से होतील याबाबत सूचना केल्या. प्रसाद कामांचा उद्देशच असा आहे की, तीर्थातून पर्यटनात रोजगाराला संधी मिळू शकेल. भाविक व यात्रेकरुंच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देणे. या योजनेत देशातील फक्त आठच ठिकाणे निवडण्यात आली. त्यात महाराष्ट्रात केवळ दोन तीर्थस्थळांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने योजना निधी दिला; पण योजना राबविण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यानी त्र्यंबकेश्वर या यादीत समाविष्ट करण्यात आले. योजना राबविण्याचे निश्चित झाल्याने त्र्यंबकेश्वरच्या कामात जवळचे हनुमान जन्मस्थान व तेथील हेमाडपंती मंदिरे व जैन तीर्थंकर आदींच्या अवशेषांचे जतन करणे व मंदिरांचा जीर्णोद्धार करणे आदी कामांचा यात समावेश आहे. अंजनेरीचे ही सर्व कामे पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील आहेत. त्र्यंबकेश्वर येथेही काही कामांचा ‘प्रसाद’मध्ये सहभाग आहे. या कामात नगर परिषदेचादेखील सहभाग असावा, त्यांचेही नियंत्रण असावे या पार्श्वभूमीवर पालिकेच्या शिष्टमंडळाने भट्टाचार्य यांना साकडे घातले. याप्रसंगी अभियंता विनय वावधन, महेश बागुल, सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे, राजेश घुले, तुषार पाटील आदी उपस्थित होते.सुरू असलेली कामेगौतम, गंगासागर आणि इंद्रतीर्थ तलावाचे सुशोभीकरण, तीर्थराज कुशावर्ताचे सुशोभिकरण, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागील उद्यानाचे विकसन, श्रीगंगा गोदावरी घाट चौक विकसन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक विकसन, अहिल्या गोदावरी संगमघाट चौकाचे विकसन, यात्रास्थानाकडील प्रवेश मार्गाचे विकसन, मुख्य प्रवेशमार्गाचे विकसन, वाहनतळाचे विकसन, संगम घाटावर पायाभूत सुविधांचे विकसन.

टॅग्स :GovernmentसरकारReligious Placesधार्मिक स्थळे