शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांचे विस्मरण

By admin | Updated: November 18, 2016 23:56 IST

नासीर सय्यद : तेरा पुस्तकांचे मराठी, हिंदी, उर्दूमध्ये लवकरच भाषांतर

नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात सहभागी शेकडो मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अजोड आहे, मात्र दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतकेच मुस्लीम स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांचे बलिदान व शौर्याची इतिहासकारांनी दखल घेतली. बहुसंख्य मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांचे इतिहासकारांना विस्मरण झाल्याने त्यांची कामगिरी अद्याप पडद्याआडच राहिल्याची खंत आंध्र प्रदेशमधील साहित्यिक प्रा. नासीर सय्यद यांनी व्यक्त केली.टिपू सुलतान यांच्या जयंती सप्ताहनिमित्त मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने सय्यद यांचे शहरात विविध ठिकाणी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लिहिलेल्या ‘द इमोर्टल्स’ या पुस्तकात तब्बल १५५ मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीचा इतिहास इंग्रजी व तेलगू भाषेत सचित्र शब्दबद्ध केल्याची माहिती सय्यद यांनी दिली. स्वातंत्र्यसंग्रामात मुस्लिमांचे योगदान या विषयावर त्यांनी आतापर्यंत तेरा पुस्तके लिहिली आहेत. टिपू सुलतान यांच्याकडे म्हैसूरची सत्ता होती. त्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारून म्हैसूर सुरक्षित ठेवले. स्वातंत्र्य संग्रामात टिपू सुलतान यांचे योगदान अद्वितीय आहे. ‘म्हैसूर पुली टिपू’ नावाच्या स्वतंत्र पुस्तकात त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सय्यद यांनी यावेळी दिली. २०१४ साली प्रकाशित झालेल्या ‘द इमोर्टल्स’ या पुस्तकात १७५७ ते १९४७ पर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे. सय्यद यांच्या तेलगू, इंग्रजी भाषांत असलेल्या मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास लवकरच मराठी, हिंदी व उर्दूमध्ये भाषांतरीत करण्यात येणार असून, त्याची जबाबदारी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीने घेतल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अजीज पठाण यांनी दिली.