शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी अनुशेष, वसतिगृहाचा निर्णय योग्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:17 IST

नाशिक : ओबीसी कर्मचाऱ्यांचा अनुशेष तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या घोेषणेचे पालकमंत्री ...

नाशिक : ओबीसी कर्मचाऱ्यांचा अनुशेष तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या घोेषणेचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समर्थन केले आहे. ओबीसी संदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आदिवासी उपयोजना बैठकीनंतर अन्न, नागरी पुरवठा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नोकर भरतीमध्ये ओबीसींचा अनुशेष भरून काढण्याबरोबरच त्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्याचा आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे उभारण्याची घोषणा एका कार्यक्रमात केली होती. याविषयी भुजबळ यांना विचारले असता, त्यांनी वडेट्टीवार यांचा निर्णय योग्यच असल्याचे म्हटले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओबीसी पदोन्नती तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृहे उभारण्याबाबत केलेली घाेषणादेखील योग्य असल्याचेही भुजबळ म्हणाले.

ओबीसी समाजातील प्रश्न सुटले पाहिजेत त्याबरोबरच समाजातील विद्यार्थी आणि कामगार वर्गाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेदेखील भुजबळ यांनी याप्रसंगी सांगितले.

दरम्यान, जलयुक्त शिवार योजेनेचे नाव मुख्यमंत्री जलसंवर्धनशिवाय करण्यात आले, तर बिघडले कुठे, असे भुजबळ यावेळी म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेचे नाव बदलण्यात आल्याने भाजपकडून होत असलेल्या टीकेविषयी बोलताना भुजबळ यांनी भाजपने आपल्या कार्यकाळात अनेक योजनांची नावे बदलल्याची आठवण करून दिली. नावे बदलण्याचा पायंडा भाजपनेच घालून दिला. तोच महाआघाडी सरकार चालवत असल्याचे सांगून भाजपने त्यांचे सरकार आल्यानंतर पुन्हा नावे बदलावीत, असा टोलाही लगावला.

--इन्फो--

शेती केवळ केंद्राचा विषय नव्हे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणाविषयी बोलताना भुजबळ म्हणाले, हमीभाव होत आणि राहील, असे पंतप्रधानांनी सांगितले असल्याचे त्यांच्या विधानाचे स्वागतच आहे. शेतकऱ्यांनाही तेच हवे आहे. मात्र आश्वासन देणे आणि कायदा करणे वेगळे आहे. विरोध होत असलेला कृषी कायदा रद्द करून नवा कायदा करावा, यासाठी शेतकरी संघटना आणि राज्य सरकारे यांच्याशीदेखील चर्चा केली पाहिजे. कारण शेती हा केवळ केंद्राचा विषय नाही, असे भुजबळ म्हणाले.