शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:09 IST

‘अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता’ या गाण्याचे बोल ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उठले. एचआयव्हीबाधित मुलांच्या कंठातून ते गाणे ऐकताना गुरुवारी सर्वजण भावुक झाले. ‘श्वास एक, नवीन आस’ हे शीर्ष घेऊन मानवतेच्या सेवेसाठी २० वर्षं संगमनेर येथे कार्यरत असलेल्या, स्वयंप्रेरित सामाजिक विकास या संस्थेकडून गणपती उत्सवाच्या निमित्ताने प्रेरणा मिळावी.

नांदगाव : ‘अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता’ या गाण्याचे बोल ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उठले. एचआयव्हीबाधित मुलांच्या कंठातून ते गाणे ऐकताना गुरुवारी सर्वजण भावुक झाले. ‘श्वास एक, नवीन आस’ हे शीर्ष घेऊन मानवतेच्या सेवेसाठी २० वर्षं संगमनेर येथे कार्यरत असलेल्या, स्वयंप्रेरित सामाजिक विकास या संस्थेकडून गणपती उत्सवाच्या निमित्ताने प्रेरणा मिळावी.या उद्देशाने नांदगावच्या युवा फाउण्डेशनने येथील चांडक सभागृहात संस्थेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात एचआयव्हीग्रस्त मुलांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार व नीलेश परभर यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. एचआयव्हीबाधितांसाठी १९९८पासून सदर संस्था काम करत आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमधून मुले आलेली आहेत. मुख्यत: वारांगनांची मुले यात असून, त्यांचा सर्वप्रकारे सांभाळ करण्यात येतो. संस्थेचे काम करणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे आहे. कारण या एचआयव्हीबद्दल समाजात असलेले गैरसमज होय. समाजाचा विश्वास मिळविताना आयुष्य खर्ची पडले. शासनाचे कोणतेही अनुदान मिळत नाही. तरीही आम्ही आनंदी आहोत. मोडलेली आयुष्ये उभारताना मिळणारे सुख व समाधान जगातील कोणत्याही आनंदापेक्षा मोठे आहे. जनसेवा मित्रमंडळ व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या माध्यमातून कपडे व इतर चीजवस्तू, नस्तनपूर संस्थानकडून आर्थिक व भोजन सामग्रीची मदत मिळाली. कवडे यांच्या हस्ते पवार यांना सन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष राजेश कवडे, विधिज्ञ गुलाबराव पालवे, प्रा.सुरेश नारायणे, माजी सैनिक नानासाहेब काकळीज, स्मिता दंडगव्हाळ, आशा पवार उपस्थित होते. सुमित सोनवणे, आनंद घोडके, मयूर दाभाडे, प्रसाद वडनेरे, भोजराज सोनार, दिनेश पाटील, सुमित गायकवाड, लखन दाभाडे, विकास शर्मा, उबेद शेख, शंभूराजे, मोरया मित्रमंडळ, डॉ. गणेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.