शहरं
Join us  
Trending Stories
1
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
2
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
3
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
4
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
5
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
6
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
7
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
8
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
9
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
10
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
11
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
12
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
13
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
14
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
15
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
16
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
17
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
18
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
19
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
20
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."

नायलॉन मांजाने चिरला दोघांचा गळा

By admin | Updated: January 6, 2017 00:14 IST

जिवाला घोर : संक्रांतपूर्व पाच घटना; वाचले दुचाकीस्वारांचे प्राण

नाशिक : नायलॉन मांजामुळे पक्ष्यांबरोबरच मानवालाही दुखापत होण्याच्या घटना शहरासह उपनगरांमध्ये सातत्याने घडत आहेत. वडाळागाव, अशोकनगर परिसरात दोघा दुचाकीस्वारांचा गळा नायलॉन मांजाने चिरला गेला आहे. संक्रांतपूर्व नायलॉन मांजाने जखमी होण्याच्या पाच घटना आतापर्यंत घडल्या आहेत.वडाळागावातून रविशंकर मार्गाने गुरुवारी (दि.५) दीपक शंकरसिंग ठाकूर (२४, रा. सिडको) हा युवक दुचाकीने जात असताना नायलॉन मांजा तुटून त्याच्या गळ्यात अडकला आणि दुचाकीपुढे गेल्याने मांजा ओढला जाऊन दीपकचा गळा कापला गेला. सुदैवाने त्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटू दिले नाही. सदर घटना परिसरातील युवकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने ठाकूर यास त्यांनी रुग्णालयात हलविले. गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता, असे प्रत्यक्षदर्शी रमीज पठाण यांनी सांगितले. ठाकूर हे एका खासगी रुग्णालयात कामाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसरी घटना सातपूरच्या अशोकनगर परिसरात घडली. सातपूरला खरेदीसाठी गेलेले राजेंद्र विश्वकर्मा खरेदी करून दुचाकीने कुटुंबासमवेत घराकडे जात असताना अचानकपणे आलेल्या नायलॉनच्या मांजाचा फास लागल्याने त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. सदर बाब परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. दोन्ही जखमींच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त करत नायलॉन मांजा लोकांनीच खरेदी करू नये, असे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)